...... चालत्या बोलत्या वेधशाळा......
एक मे चा दिवस होता. दक्षिण गोव्यातील नेत्रावली गावाजवळ सायजणी येथे आमच्या संस्थेचे या वर्षीचे निसर्ग शिबीर होते. ५०-५५ जणांना लागणारा भाजीपाला किराणा नेत्रावली गावातून खरेदी करणे भाग होते. पुढे २३ कि.मी.मध्ये कांही मिळण्याची सोय नव्हती. कामानिमित्त तेथील लोक पणजी, मुंबई भागात असतात. शेती हा स्थानिक मुख्य व्यवसाय.गावापर्यंत डांबरी सडक नुकतीच झाली आहे. गावातील ४ थी पर्यंतची शाळा हे आमच्या कँपचे निवासस्थान.
नेत्रावली अभयारण्याच्या मधोमध गाव. रावण्या डोंगराच्या कुशीत. गावाच्या सभोवताली हिरवे घनदाट जंगल,डोंगर. खळाळत बारमाही वाहणारे झरे. गावात शेताच्या बांधावर आंबा, फणसाची झाडे. फणस पिकून कोण उतरवते का याची वाट पहात गळून पडू पहात होते.भाताची काढणी चालू होती. त्यामुळे शिवारात एकच धांदल होती.
शिधा सामान घेऊन २३ कि.मी. घाट पार करीत अंधेरून येण्याचे आत आम्हाला सायजणी गाठायचे होते. टेंपोत सामान भरले, आता निघायचे, इतक्यात टेंपोवर ताडपत्री नसल्याचे लक्षात आले.आकाश काळया ढगांनी ओथंबले होते. रावण्या डोंगराच्या बाजूने विजाही होत होत्या. मी दुकानदाराला म्हणालो, ``ताडपत्रीवाला टेंपो हवा, कारण पाऊस येणार.'' दुकानदाराने कोकणी हेल काढीत म्हटले, ``तू जा रे - पाऊस नाही येणार.'' लोक रोखठोक बोलतात. `बहुतेक', `अमुक तमुक', `साधारणपणी' असे कधीच ऐकू येणार नाही. `बस मिळणार`, `डॉक्टर असणार', `येेणार', `नाही येणार' अशी रोख ठोक भाषा! `नाही येणार' हा शब्द आत्मविश्वासाने दुकानदार बोलला, मग मला त्याच्या अंदाजावर अविश्वास दाखविण्याचे धाडसच झाले नाही.
वेधशाळेने वर्तविलेले हवामानाचे अंदाज ऐकून कोणी आपला दिनक्रम ठरवीत असेल का? खुद्द वेधशाळेतील कर्मचारीतरी विश्वास ठेवत असतील का?
आमचा घाटातील प्रवास सुरू झाला आणि ऐन घाटात रस्त्याच्या कामामुळे आम्ही अडकून पडलो. एवढ्यात सोसाट्याचा वारा, विजा यांचे थैमान चालू झाले. एक-दोन थेंब आलेही. साखर,पिठे पोहे सगळेच उघड्यावर होते. दोन प्लॅटिकचे मोठे शीट होते. ते काढून आच्छादन करावे म्हणेपर्यंत पाऊस, वारा, विजा सर्वच गायब! वर पाहातो तो आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. घाट संपला. सायजणीत पोचून सामान दास्तानी लावले. दुकानदाराचा अंदाज खरा ठरला.
उद्या कँपची मुले येऊन पोचणार होती. टेम्पोचे भाडे चुकते केले, तरी टेम्पोचालक तेथेच घुटमळत होता. त्याला रात्री एकट्याने नेत्रावलीला जायची भीती वाटत होती म्हणून कोणीतरी सोबत हवी होती. कामे सहकाऱ्यांवर सोपवून मला जावे लागले.
कितीही तयारी केली तरी क्रॅम्पचा पहिला दिवस गोंधळात जातो. सर्वांनाच सगळे नवीन असते. एका रात्रीत सर्वजण सर्व अडचणींशी जुळवून घेतात. तंबू ठोकणे आणि त्यात गटागटानी राहणे हा उपक्रम असतो. तासा-दीडतासांच्या प्रयत्नांनी तीन तंबू व्यवस्थित उभे झाले. आम्ही उठल्यापासून पाहात होतो. गावातील शेतकरी कापलेल्या भाताचे भारे डोक्यावरून वाहून आणीत होते. हे काम अंधारातही चालू होते. मला मुंग्यांची रांग आठवायची.
तंबू लावत असतानाच आभाळ पुन्हा भरून आले. दूरवर विजापण होत होत्या. मी एका शेतकरी गड्याला थांबविले, ``का रे बाबा आज पाऊस येणार का?'' कोकणी हेल काढीत त्याचे उत्तर, ``आज नाही येणार!'' अगदी ठाम. पुन्हा मी विचारले, ``आज नाही तर मग केव्हा येणार?'' पुन्हा उत्तर, ``उद्या संध्याकाळी जोरात येणार.''
दिवस बुडाला. जेवणे उरकून आम्ही झोपायला गेलो. मुलांचे व मुलींचे गट आपापल्या तंबूत गेले. त्यांची कुजबुज, मध्येच खो खो हसणे उशीरापर्यंत चालू होते. एव्हाना `पाऊस उद्या येणार आणि जोरात' हा चालत्या बोलत्या वेधशाळेचा अंदाज मी पार विसरून गेलो होतो. संध्याकाळ झाली. जेवणे उरकून आम्ही अंथरुणावर पडलो. विजा होऊ लागल्या. मला चालत्या बोलत्या वेधशाळेचा अंदाज आठवला. तंबूतील मुलांची थोडावेळ खसपस जाणवली. नंतर मात्र फक्त पावसाचा आणि विजांचा आवाज येत राहिला. दिवसभराच्या थकव्याने केव्हा झोप लागली आणि केव्हा सकाळ झाली ते समजलेच नाही.
बाहेर चांगलेच उजाडले होते. निरभ्र आकाश, पक्ष्यांची किलबिल, कालच्या पावसाने धुवून काढावे तसे जंगल, शेते, घरे स्वच्छ झाली होती. अशी सकाळ फार पिचत भेटते. मुले मुटकुळे करून दाटीने गाढ झोपली होती. ``पाऊस उद्या येणार आणि मोठा येणार हे तुम्हाला कसे समजले?'' हा प्रश्न त्या शेतकऱ्याला विचारणे म्हणजे नवजात बालकाला `तुला स्तनपान कोणी शिकवले' असे विचारण्यासारखेच होणार!
- शरद आपटे, १७६६, उष:काल, डॉ.आंबेडकर रोड, सांगली (मोबा.९८९०३८४४००)
जम्मू-काश्मीरविषयी खरा इतिहास लोकांसमोर आलाच नाही. याचा राष्ट्नला तर त्रास झालाच, पण नसलेल्या प्रश्नांची निर्मिती व व्याप्ती वाढली. आपल्याच लोकांना हाल सोसावे लागत आहेत. इतिहास बाहेर येण्यास कधी वावच दिला गेला नाही. जम्मू-काश्मीरचा इतिहास स्वच्छ व स्पष्ट असतानादेखील जम्मू-काश्मीरबद्दल लोकांच्या मनातील संभ्रम वाढला. काश्मीर एक स्वतंत्र राज्य आहे आणि तेथील लोकांना भारताबरोबर राहायचे नाही तसेच ते एक मुस्लिम राज्य आहे, असं बरंच काही बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला.
वस्तुस्थिती वेगळीच आहे. श्री.अरुणकुमार हे जम्मूकाश्मीरच्या अध्ययन केंद्राचे प्रमुख आहेत. त्यांच्या अभ्यासातून खऱ्या प्रश्नाकडे, त्यावरील खऱ्या उत्तरांकडे भारतीयांच्या दृष्टिकोणातून पाहण्याची बाजू कळेल.
जम्मूकाश्मीरबाबतच्या मुख्य तीन गैरसमजांवर फार भर असतो. १.भारतीय संविधानातील कलम ३७० व त्यामुळे जम्मूकाश्मीरला मिळालेला विशेष दर्जा. २.जम्मूकाश्मीर हे एक वादग्रस्त राज्य आहे. ३.जम्मूकाश्मीर हे फक्त काश्मीर नावाचे विभाजनवाद्यांचे राज्य आहे. भारतीय सरकारने जम्मूकाश्मीरच्या लोकांना दिलेल्या वचनानुरूप हमीपत्र देऊन मान्य केलेली गोष्ट त्यावेळच्या काँग्रेस पक्षाच्या आचारसंहितेप्रमाणे भारतातील इतर सर्व संस्थानांच्या विलीनीकरणासारखीच होती. याची वचनपूर्ती १९५४ मध्येच करण्यात आली. पाकिस्तानने कधी जम्मूकाश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्नीय व्यासपीठावर नेला नाही. पाकिस्तान तसे करू शकणार नाही कारण कायदेशीर बाजूने राज्याचे विलीनीकरण भारताबरोबर झालेले आहे, जशी इतर ६०० संस्थाने भारतात विलीन केली. संयुक्त राष्ट्न्संघाने जम्मूकाश्मीरच्या भारताशी झालेल्या विलीनीकरणबद्दल कधीच दावा केला नाही. जम्मूकाश्मीरचे भारतात झालेले विलीनीकरण होताना इतर राज्यांच्या विलीनीकरणाप्रमाणे सारखेच नियम वापरले गेले आहेत जे म्हैसूर, ग्वालियार, पतियाला, कोचीन आणि इतर अनेक राज्यांना वापरले गेले. या राज्यांना कुठलाही प्रश्न उद्भवला नाही.
जम्मूकाश्मीरच्या महाराजा हरिसिंगांचे १९४७ मध्ये नामाभिधान होते हिज हायनेस महाराजाधिराज श्री हरिसिंग जी बहादूर. जम्मूकाश्मीर नरेश तथा तिबेट आदिदेशाधिपती. जम्मूकाश्मीर, लडाख आणि तिबेटचे नरेश. काश्मीर म्हणजे संपूर्ण जम्मूकाश्मीर नाही. सध्या काश्मीर हे राज्य एकूण १.०१ लाख स्प्े.कि.मी. इतके आहे. त्यामध्ये ५९हजार चौ.किमी. लडाख, व २७ हजार चौ.किमी.जम्मू व फक्त १५ हजार चौ.किमी.चा प्रदेश म्हणजे काश्मीर. जम्मू काश्मीर या राज्याच्या भूमीत काश्मीर ही एक संस्थानी वसाहत आहे; जसे कर्नाटकातील म्हैसूर संस्थान. बाकीचा जम्मू आणि लडाख मिळून दोन तृतीयांश प्रदेश हा ८५% हिंदू व बौद्ध लोकसंख्येचा आहे.
लडाख हा मुस्लिमबहुल प्रदेश नाही. लडाखमधील पाच भागांपैकी चार भागांमध्ये बौद्ध लोकांची संख्या आहे. नूब्रा, चांगथंग, लेह आणि झंस्कार या भागात ८० ते ९०% लोक बौद्ध आहेत. कारगीलमधील सुरू दरीमध्ये मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. ते पण शिया पंथीय आहेत. मुस्लिम सुन्नी काश्मीर खोऱ्यामध्ये जास्त संख्येने आहेत. जम्मूमध्ये ७०% हिंदू आहेत. गेल्या ६५ वर्षांमध्ये जम्मूकाश्मीरमध्ये राष्ट्न्वाद आणि विघटनवाद अशी सतत लढाई आहे. बहुसंख्य लोक रट्निवाष्चारी आहेत. फक्त पाच जिल्ह्यांत विघटनवादी लोक राहतात. जम्मूकाश्मीर हे संविधानाने भारताचे अविभाज्य अंग आहेच. मुस्लिमांपैकी १४% हे गुजर, ८% हे पहाडी रजपूत मुस्लिम, १०% शियापंथीय मुस्लिम आहेत. यापैकी एकजणसुद्धा विघटनवादी नेता नाही.
फाळणी ही संकल्पना फक्त इंग्रजांच्या आधिपत्याखालील भारताची झाली. म्हणजे भारताचा फक्त ६५% भाग. १९४७ पूर्वी ७५% लोकसंख्या असलेल्या भारतातील ६५% भूभागावर इंग्रजांचा अंमल होता. उरलेला ३५% भूभाग हा निरनिराळया भारतीय वा संस्थानिकांच्या आधिपत्याखाली होता. उदा.म्हैसूर, कोचीन, पतियाला, बडोदा, जम्मूकाश्मीर वगैरे. या संस्थानांबरोबर इंग्रज सरकारने काही करार केले होते. स्वतंत्र भारताच्या १९४७च्या स्वतंत्रता अधिनियम कायद्याप्रमाणे पाकिस्तान म्हणजे सिंध पश्चिम, पूर्व बंगाल, उत्तर पश्चिम किनारा आणि आसाममधील सिल्हेट जिल्हा यांचा भूभाग.
ब्रिटिश संसदेमध्ये स्वतंत्र भारताचा अधिनियम कायदा झाल्यावर लॉर्ड माँटबॅटन यांनी सर्व संस्थानांच्या वतीने प्रतिनिधित्व केले. इंग्रज व भारतातील निरनिराळया संस्थानांचे राजे व त्यांच्या संस्थानांशी झालेले करार संपुष्टात आल्याचे त्यांनी सर्व राजांना सांगितले. त्यांच्यावर राजकीय वर्चस्व राहणार नाही व ते पूर्णपणे स्वतंत्र होतील. प्रत्यक्षात इंग्रजी सत्ता असताना भारत हा एकसंघ होता. कारण तो भौगोलिक व सामाजिकरित्या जोडलेला होता व त्यामुळे संस्थानांनी कोणत्या राजसत्तेत विलीन व्हायचे हा त्यांचा मताधिकार होता. लॉर्ड माँटबॅटन यांनी संस्थानिकांना सल्ला दिला की, दोन गोष्टी लक्षात ठेवून आपण भारत किंवा पाकिस्तानमध्ये आपल्या संस्थानाचे विलीनीकरण करावे, त्या म्हणजे आपले राज्य हे भौगोलिकदृष्ट्या त्या भागाला जोडले गेले आहे व आपल्या राज्याची बहुतांश विषयातील हिते जपली जावीत.
हैद्राबाद संस्थानच्या निजामाला पाकिस्तानशी विलीनीकरण करायचे असूनसुद्धा सीमारेषा संलग्न नसल्याने तो करू शकला नाही. त्याने ७ राष्ट्न्े आणि संयुक्त राष्ट्नंकडे हैदराबाद हे स्वतंत्र राष्ट्न् म्हणून मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव पाठविले परंतु स्वतंत्र भारत अधिनियम कायद्यात तशी व्यवस्था नव्हती. ब्रिटिशांनासुद्धा निजामाच्या या प्रस्तावापुढे काही करता आले नाही.
कलातच्या नवाबाने बलुचिस्तानचा मोठा भूभाग, जो सध्या पाकिस्तानमध्ये आहे, तो भारतामध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव केला होता. कलातच्या भौगोलिक सीमा भारताशी संलग्न नसल्यामुळे त्याचा प्रस्ताव नाकारला होता. त्यानंतर कलातच्या नवाबाने पूर्व व पश्चिम पाकिस्तानच्या भौगोलिक सीमासुद्धा एकमेकांशी संलग्न नसल्याचे सांगून बलुचिस्तानातील कलातचा भूभाग हा पश्चिम भारत म्हणून होऊ शकतो असा दावा केला. परंतु भारत सरकारने पूर्व व पश्चिम पाकिस्तान ही स्वतंत्र भारताच्या अधिनियम कायद्याप्रमाणे पाकिस्तानच्या आधिपत्याखाली राहतील असे मान्य केले होते. विलीनीकरणासाठी भूभागाची संलग्नता ही कायद्याप्रमाणे आवश्यकता होती.
फाळणी ही हिंदू-मुस्लिम लोकसंख्येनुरूप झाली होती, तर जम्मूकाश्मीर पाकिस्तानमध्ये विलीन व्हावयास हवा होता काय? - नाही. कारण तो इंग्रजांच्या आधिपत्याखाली नव्हता. इतर ५००हून अधिक राजसंस्थाने विलीन झाली त्याप्रमाणे हा अधिकार जम्मूकाश्मीरच्या महाराजांना होता. त्यांच्या मताला बहुतांश लोकांची मान्यता होती. त्यांच्या निर्णयाला शेख अब्दुल्ला यांचे नेतृत्व असलेल्या राजकीय पक्षाचासुद्धा पाठिंबा होता.
हिंदूबहुल राज्याची पाकिस्तानात विलीनीकरणाची इच्छा असलेले राजस्थानातील अमरकोट हे जोधपूर व जैसलमेर जवळ असलेले राज्य सध्या पाकिस्तानात सिंध प्रांतात आहे. अमरकोटमध्ये ९०% हिंदू लोकसंख्या १९४७ला होती व अजूनही हिंदूबहुल प्रदेश आहे. राजा राणाचंद्र सिंग हा हिंदू होता. जीना आणि त्यांचे पाकिस्तानी अनुयायी जम्मूकाश्मीरच्या पाकिस्तानमधील विलीनीकरणासाठी बोलत होते ते ढोंगी मनोवृत्तीमुळे. अमरकोट हे पाकिस्तानात विलीन करण्याचे सत्य ते मानत नव्हते. उलट त्यांनी राज्याचे नाव बदलून उमरकोट हे इस्लामिक नाव दिले. १९४७च्या स्वतंत्र भारताच्या अधिनियम कायद्याने जे संस्थानिक होते त्यांना विशेष अधिकार मिळाला होता. जनतेलासुद्धा निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. नाहीतर अमरकोट हे ९०% हिंदू लोकसंख्या असलेले राज्य पाकिस्तानला मिळाले नसते. २६ ऑक्टोबर १९४७ या दिवशी जम्मूकाश्मीर संस्थान भारतामध्ये कायद्याने विलीन झाले. जम्मूकाश्मीरचे विलीनीकरण हे काही अटी घालून झाले नाही. विलीनीकरणाबद्दल कोणताही विवाद नाही. २७ ऑक्टोबर १९४७ ला त्यावर गव्हर्नर जनरल माँटबॅटन यांची सही झाली व जम्मूकाश्मीर भारताचे कायदेशीर अभिन्न अंग झाले.
शाक्सगाम दरी हा प्रांत जम्मूकाश्मीरचा सियाचीनजवळील उत्तरेचा भाग आहे. हा भाग पाकिस्तानने १९४७ पासून अवैधरित्या गिलगिट आणि बाल्टिस्तानबरोबर घेतला. १९६३ साली पाकिस्तानने हा भारताचा भाग चीनला आपल्या स्वार्थासाठी देऊन टाकला. शक्सगाम दरीच्या संदर्भात जो करार केला त्यात पाकिस्तानने म्हटले, `हा करार चीन आणि पाकिस्तान यांच्यातील आहे.' भारताने ही बाब निषेध म्हणून नोंदवली. पण आंतरराष्ट्नीय वा अंतर्गत दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही. गिलगिट-बाल्टिस्तान हा प्रदेश भारतासाठी महत्त्वाचा आहे तो पाकिस्तानने बळकावला आहे. खैबर खिंड व गिलगिट यामधून जाणारा हिंदुकुश पर्वत ही नैसर्गिक सीमारेषा म्हणून वापरली गेली तर पुढे मध्य व पश्चिम आशियाकडून कुठल्याही प्रदेशाचे उल्लंघन होणे वाचेल. गिलगिट-बाल्टिस्तान हा भूभाग हजारो वर्षांपासून जुन्या सिल्क मार्गाचा महत्त्वाचा दुवा आहे. हा भाग मध्य व पश्चिम आशिया, भारत, चीन आणि दक्षिणपूर्व आशिया यांना जोडणारा व्यापार केंद्राचा मुख्य बिंदू होता. गिलगिट-इराण हे अंतर १ हजार किमी. म्हणजे गिलगिट-दिल्लीइतकेच आहे. गिलगिट-मास्को हे अंतर ३५०० किमी म्हणजे दिल्ली-चेन्नईएवढे आहे. हिमालयातील दहा उंच शिखरे या प्रांतात आहेत. गिलगिटमध्ये जगातील मोठे सुवर्णसाठे आहेत. आता चीनने तेथील खाणी चालवण्याचे अधिकार आपल्या हाती घेतले आहेत.
अक्साई चीन हा जम्मूकाश्मीरचा भाग आहे व तो भारतात कायद्याने विलीन झालेला आहे. पश्चिम हिमालयाच्या जम्मूकाश्मीरमध्ये असण्याबद्दल चीनचे भारताशी भांडण कधीच नाही. तिबेट व चीन सीमारेषेबद्दल कोणताही प्रश्न नव्हता. अरुणाचल प्रदेशजवळील भागाबद्दल त्यांचा प्रश्न होता. अक्साई चीन हा चीनव्याप्त जम्मूकाश्मीर झाला. १९५० साली चीनने तिबेटचा ताबा घेतला. चीनला तिबेटशी जोडणारा आठ लेनचा महामार्ग हा एका डावपेचाचा भाग होता.
सामान्य भारतीयांच्या मनात जम्मूकाश्मीरबद्दल गैरसमज आहेत. बहुसंख्य जम्मूकाश्मीरवासी हे भारताचे अभिमानी नागरिक आहेत. जम्मूकाश्मीर हे विवादित राज्य मुळीच नाही. ते एक विशेष दर्जा असलेले राज्य आहे हा गैरसमज आहे. मग याठिकाणी कलम ३७० कसे आले? जम्मूकाश्मीरमधील लढाईच्या अभूतपूर्व परिस्थितीत संयुक्त राष्ट्न्संघाशी असलेला गुंता वाढला होता. जम्मूकाश्मीरचा बराचसा भाग हा पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी व्यापला होता, तसेच मृतवत झालेली लोकप्रजा परिषद सभा चळवळ आणि अधिकृत विधानसभेच्या अधिवेशन होण्याची शक्यता मावळलेली होती. या सर्व गोष्टींमुळे भारताच्या लोकसभेने तात्पुरती व्यवस्था म्हणून कलम ३७० आणले. असे स्पष्ट असताना इतके दिवस ते का अस्तित्वात आहे? हे केवळ सोयीचे राजकारण व लांगूलचालन करण्याच्या भारताच्या रणनीतीचा दुर्दैवी भाग होता. जम्मूकाश्मीर हा एक चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या दिशेने, चुकीचा आधार घेऊन सर्व भारतभर गेले ६५ वर्षे राबवलेला दुर्दैवी विषय आहे. ज्यामुळे उर्वरीत भारतातील लोकांवर व प्रामुख्याने जम्मूकाश्मीरच्या जनतेवर झालेला अन्याय आहे. सध्या भारत हा जम्मूकाश्मीरला फक्त काश्मीर घाटीचाच विषय आहे असे पाहतो.
शेख अब्दुल्ला आणि त्यांचे कुटुंब हेच या राज्याचे एकमेव प्रतिनिधी आहेत, ही आणखी एक मोठी चूक. शेख हे जम्मू व लडाख प्रांताचे नेते कधीच नव्हते पण भारत सरकारने ही गोष्ट ओळखली नाही.
फाळणीच्या वेळी इंग्रज सरकारचा एक गुप्त कट होता की जम्मूकाश्मीर हे राज्य पाकिस्तानमध्ये जावे. भौगोलिक नीतीने जम्मूकाश्मीर हा एक आदर्श भूभाग होता. कम्युनिस्ट रशिया, चीन व मध्य आशियाला जोडणारा हा भाग होता. पाकिस्तानमध्ये तो देण्याचा प्रयत्न केला गेला. तो फसल्यावर तो भाग स्वतंत्र जम्मूकाश्मीर प्रांत कसा होईल हे पाहिले गेले. भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शेख अब्दुल्ला अमेरिकेत गेले. ते चूक होते. महाराज हरिसिंग हे जम्मूकाश्मीरचे प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य असून शेखना कोणताही कायदेशीर अधिकार नव्हता. तरीसुद्धा त्यांना भारत सरकारतर्फे दोन वेळा पाठवले गेले. कारण नेहरूंचा शेख अब्दुल्लांवर पूर्ण विश्वास व महाराजांविषयी तिरस्कार होता. स्वतंत्र जम्मूकाश्मीरची कल्पना अमेरिकेतील लेक सक्सेसच्या भेटीदरम्यान बहुधा सीआयएने रुजवली.
जम्मू व लडाख येथे भारतविरोधी कारवाया कधीच झालेल्या नाहीत. पाच जिल्ह्यांतील सुन्नी पंथीय मुस्लिमांचा तथाकथित प्रश्न आहे. तिथे जम्मूकाश्मीरपैकी ३० टक्के लोकसंख्या आहे आणि उरलेली ७० टक्के भारतीय तिथे शांततेत राहात आहेत. यासीन मलिक, शबीर शेख, सैद गिलानी, मीरबाज फारुक, महेबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, सज्जाद लोन आणि असिया अंद्राबी हे सर्व या पाच जिल्ह्यांतील आहेत. हेच आठ काश्मीरी लोक भारतीय दूरदर्शनला माहीत आहेत. तो एक माध्यमांनी राबवलेला कार्यक्रम आहे. वृत्तवाहिन्या चर्चासत्रात कोणालाही जम्मू वा लडाखमधील म्हणून संबोधत नाहीत. बहुतेक भारतातील लोकांना जम्मूकाश्मीरमधील रट्निवाष्चारी लोकांचा आवाजच ऐकू येत नाही. याला `काश्मीरचा प्रश्न' असे कधीच म्हणू नका. हा जम्मूकाश्मीरमधील दहशतवाद, विघटनवाद किंवा मूलतत्ववाद आहे. आपल्याला छत्तीसगढमध्ये नक्षलवाद माहीत आहे. त्याला आपण छत्तीसगढचा प्रश्न असे म्हणतो का? बिहारमध्ये गरीबी आणि मागासलेपणा आहे, आपण त्याला बिहारचा प्रश्न आहे असे म्हणतो का? गेल्या ६५ वर्षांतील जम्मूकाश्मीरचे खरे बळी कोण हे भारतीयांनी जाणले पाहिजे.
(जम्मू-काश्मिर अध्ययन केंद्राचे श्री.अरुणकुमार यांच्या मूळ प्रश्नोत्तररूपी इंग्रजी पुस्तिकेचे भाषांतर रामकृष्ण पटवर्धन यांनी केले, त्याचा हा संक्षेप.)
मराठी पुस्तिकेसाठी संपर्क :
श्री.रामकृष्ण पटवर्धन
(मोबा.९८५०८८८७११)
जम्मू काश्मीर अध्ययन केंद्र, सांगली
।। कृण्वंतो विश्वमार्यम् ।।
(हे जग सभ्य सुप्रतिष्ठित करू)
विश्वसंचाराची देदीप्यमान भारतीय गाथा
प्राचीन भारतातील अभूतपूर्व नौकानयन व त्याचे शास्त्र
काही लोकांच्या मते हिंदू धर्मामध्ये समुद्रपर्यटन निषिद्ध मानले जात होते; परंतु इतिहासाचे अवलोकन करता त्या मताला कोठेही आधार मिळत नाही. उलट पाच हजार वर्षांपूर्वी संपूर्ण जगात भारतीय लोक सर्वश्रेष्ठ दर्यावर्दी होते. नजरेच्या टप्प्यात न मावणाऱ्या सागराच्या अथांगतेपलीकडे नेमके काय आहे, याची उत्सुकता भारतीयांना होती.
सर्वप्रथम अश्ववर्मन नावाच्या साहसी वीराने आपल्या नौका बोर्निओ व अमेरिकेच्या तटाला लावल्या होत्या व त्याने तेथे मय नावाची संस्कृती स्थापन केली. अमेरिकेचा शोध कोलंबसने लावलेला नाही तर त्याच्या हजारो वर्षे आधी तेथे अश्ववर्मन नावाचा भारतीय नाविक पोचला होता.
पाच हजार वर्षांपूर्वीची बंदरे(पत्तन)
सौराष्ट्नमध्ये सर्व सोयीसुविधांनी युक्त नौका अगदी बंदराच्या किनाऱ्याला लागतील असे बंदर असल्याचे दिसून आले आहे. नौका या बंदराला लागत असत. भारताला पूर्व पश्चिम सुमारे २६०० मैलांचा समुद्रकिनारा लाभला आहे. ठिकठिकाणी अशी अद्ययावत् बंदरे भारतीय लोक पाच हजार वर्षांपूर्वीपासून बांधत होते. `पेलीप्लस ऑफ दी अेरीग्रीअस सी' नावाचा अतिप्राचीन ग्रंथ एका पाश्चात्य लेखकाने (नाव उपलब्ध नाही) लिहिलेला आहे. त्यात चोल, दाभोळ, राजापूर, मालवण, गोवा, चेन्नापूर, कोट्टायन, कन्याकुमारी, कोणार्क, मसुलीपट्टम, नागपट्टम, कावेरीपट्टम, भृगूतीर्थ अशा असंख्य उत्तम बंदरांची वर्णने आहेत. या बंदराच्या साहाय्याने हिरे, सोने, माणिक, मोती यासारख्या मौल्यवान वस्तूंचा व्यापार भारतीय करत होते.
जहाजनिर्मितीचे प्रगत शास्त्र
जगप्रसिद्ध दर्यावर्दी कोलंबस फार फार तर तीन महिने न थांबता जलपर्यटन करत होता. परंतु प्राचीन भारतीय दर्यावर्दी सलग सहा सहा महिने, पिचत प्रसंगी त्याहीपेक्षा जास्त काळ न थांबता प्रवास करत होते. भारतामध्ये `सातकर्णी' नावाचा महापराक्रमी सम्राट होऊन गेला. त्याला `त्रिसमुद्रतोयपीतवाहन' म्हणजे ज्याचे घोेडे तीनही समुद्राचे पाणी प्यायले आहेत, अशी उपाधी होती. असे प्रवास करण्यासाठी मजबूत जहाजे असणे आवश्यक होते. त्याचेही शास्त्र प्राचीन भारतीयांनी प्रगत केले होते. प्राचीन भारतामध्ये नौकानिर्मितीवर अनेक ग्रंथ होते. कालौघात ते नष्ट झाले. परंतु भोजराजलिखित `युक्तीकल्पतरू' नावाचा नौकानिर्मितीवरील ग्रंथ यामध्ये नौकानिर्मितीचा अतिसूक्ष्म विचार केलेला दिसून येतो. गोड्या पाण्यातील नौका व खाऱ्या पाण्यातील नौका असे मूलभूत वर्गीकरण करण्यात येऊन या नौका कशा तयार कराव्यात, समुद्रातील अक्राळविक्राळ लाटांना तोंड देण्यासाठी कोणती काळजी घ्यावी वगैरेचे अतिसूक्ष्म मार्गदर्शन या ग्रंथात आहे. लहान नौका ते अतिप्रचंड नौका याचे अगणित प्रकार ग्रंथात वर्णिलेले आहेत. कोणत्या नौका कोणत्या कामासाठी वापराव्यात, जसे की व्यापार, मालवाहू नौका, युद्धनौका, प्रवासासाठीच्या नौका याचेही खुलासेवार मार्गदर्शन आहे.
रंगसंगती
कोणत्या नौकांना कोणते रंग द्यावेत, कोणत्या नौकांना व्याघ्रमुख, सिंहमुख, सर्पमुख वगैरे कोणते मुख लावावे याचे मार्गदर्शन या ग्रंथात आहे. या ग्रंथावरून असे दिसून येते की भारत वर्षामध्ये विस्मयचकीत व्हावे इतक्या महाप्रचंड आकाराच्या नौका बांधल्या जात होत्या. निरनिराळे कक्ष(केबिन्स)असलेल्या, तीन तीन मजली नौका बांधून त्याचा वापर करण्याचे ज्ञान त्यावेळी भारतीयांना होते. नुसती मालवाहतूकच नव्हे तर हत्ती, घोडे, उंट आदी अजस्त्र प्राणी व युद्धसामग्री वाहून नेणाऱ्या प्रचंड आकाराच्या नौकाही बांधून वापरल्या जात होत्या.
दीर्घ समुद्रपर्यटनाचे वेळी कोणत्या काळज्या व दक्षता घ्याव्यात याचेही सूक्ष्म व खुलासेवार मार्गदर्शन प्राचीन ग्रंथांतून आढळून येते. सागरातील शार्क, व्हेल यासारख्या अनेक अजस्त्र जलचरांची वर्णने, त्यांच्यापासून येणारे धोके, त्यावरील उपाय, प्रवासात जनावरे व माणसांना होऊ शकणाऱ्या व्याधी, त्यावरील उपाय, पूर्व व पश्चिमेकडे हळूहळू होणारे वातावरणातले बदल वगैरे वर्णने. आणखी एक मती कुंठित करणारी गोष्ट म्हणजे अटलांटिक महासागरात अमेरिकेच्या सध्याच्या मियामी, फ्लोरीडा, सेन ज्युआन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बेटांच्या परिसरात असणाऱ्या `बर्म्युडा ट्न्ँगल'चे धोकेसुद्धा प्राचीन भारतीयांना माहीत असावेत.
नौकानिर्मितीसाठी साधनसामग्री
कोणत्या प्रकारच्या नौकांसाठी कोणते लाकूड वापरावे, ते भारताच्या कोणत्या जंगलातून मिळते, त्याचा वापर कसा करावा, जहाजांची शिडे कशी तयार करावीत याची शास्त्रशुद्ध माहिती `युक्ती कल्पतरू' या ग्रंथात सापडते. दिशांचे ज्ञान देणाऱ्या होकायंत्राचा शोध भारतीयांनी लावला त्याला `मत्स्ययंत्र' व `लोहमत्स्य' अशी नावे होती.
सांगण्याचा मुद्दा असा की, प्राचीन भारतीय राजे, दर्यावर्दी, तिन्ही सागरांचे स्वामी होते. यामध्ये ऋषीवरही मागे नव्हते. अगस्ती ऋषींनीही समुद्रपर्यटन केले होते. समुद्रपर्यटन सर्वेषाम् निषिद्ध नव्हते, तर सीमोल्लंघन करणे हा अभिमानास्पद साहसी विषय होता.
- महेश्वर रायकर, पिंगुळी
(संदर्भ - कुशाग्रसिंधु)
एक थरारक अनुभव....
मुळा धरणाच्या कामात २० मे १९६१ रोजी कॉफर डॅम फुटल्यानंतर नदी पात्रांतील काम बंद झाले होते. त्यानंतर चेनेज २३०० ते ५२०० मध्ये डि्न्लींग, ग्राऊंडींग, काँक्रीट डायफ्रॅम इत्यादी कामे चालू होती. नदीला पूर आल्यास सदर कामांना धोका पोहोचू नये यासाठी चेनेज ५२०० जवळ कटऑफमध्ये आडवा बांध घातला होता. सदर बांधामध्ये पाईप घातलेली होती व तीवर गेट बसविले होते. त्यामुळे नदीचे पाणी वाढले तर गेट बंद करून पाणी वाढले तर गेट बंद करून पाणी आत येणार नाही अशी व्यवस्था करता येत होती.
नदीच्या पाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी या आडव्या बांधावर रात्रंदिवस पहारेकरी व त्याच्या जोडीला गेजमन नेमले होते. या बांधाजवळ मराठीत मोठे फलक लावले होते. त्यावर पाण्याची पातळी किती आली की कोणी काय करायचे याच्या सूचना लिहिलेल्या होत्या. पाणी गेटच्या लेव्हलच्या वर गेले व वाढत आहे असे दिसले की वसाहतीत निरोप पाठवून सायरन वाजविण्याची व्यवस्था होती. सायरन ऐकताच वसाहतीतील अभियंते, उपअभियंते, मुकादम, मेस्त्री यांना धरण स्थळावर जायचे होते. तेथे गेल्यावर कोणी मजूर आणायचे, कोणी ट्न्ॅक्टर्स आणायचे इ. कामे ठरवून दिली होती. अशा रीतीने आम्ही पुराची आपत्ती आली तर तोंड देण्यास सज्ज झालो होतो.
एके रात्री दोन-अडीचच्या सुमारास वसाहतीत सायरन वाजला. आम्ही आत्मसात केलेल्या शिक्षणाचा उपयोग करण्याची वेळ आली. सायरन ऐकताच आम्ही एकमेकांना जागे केले व सर्वजण ऑफीसजवळ उभ्या असलेल्या ट्न्कमधून साईटवर पोहोचलो आणि आपापल्या कामाला लागलो. ट्न्क्स, ट्न्ॅक्टर्स कामाच्या ठिकाणी आले. वसाहतीतून मजूरही आले. कामास सुरुवात झाली. अर्ध्या तासात कामाला गती आली. मिक्सर्स व इतर मशीनरी ओढून नेऊ जाऊ लागली. तीन-चार ठिकाणी मजूर सिमेंटची पोती ट्न्क्समध्ये भरू लागले. पंपांची कनेक्शन्स सोडविली जाऊ लागली. सर्वजण कामात असतानाच मा.चितळेसाहेब व मा.शुक्लसाहेब पाहणी करून सूचना देऊन गेले. सर्व सामुग्री बाहेर काढण्यास आणखी तासभर लागला असता. तेवढ्या वेळात बांध फुटू नये म्हणून जो तो प्रार्थना करत होता.
.... आणि चार वाजण्याच्या सुमारास परत एकदा सायरन वाजला व सर्व काम थांबविण्याच्या सूचना दिल्या गेल्या. पाणी आता उतरू लागले असेल म्हणून आम्ही किती पाणी उतरले ते बघण्यासाठी बांधाकडे धावलो. चितळेसाहेब आणि शुक्लसाहेब नदीकडे तोंड करून बांधावर उभे होते. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा कळले की नदीला पूर वगैरे आलेला नव्हता. साहेबांनी आपत्कालीन लढण्याच्या आमच्या क्षमतेची परीक्षा घेतली होती. तीमध्ये आम्ही सर्वजण पास झालो होतो.
त्यावेळी आपत्तीशी लढलेले आम्ही सर्वजण आता निवृत्त झालो आहोत व निवृत्त अभियंते म्हणून समाजात वावरताना, एखादी आपत्ती आली तर काही करू शकतो अशी उमेद बाळगून आहोत. (मा.चितळे जे आज जागतिक जलतज्ज्ञ आहेत ते त्यावेळी आमचे कार्यकारी अभियंता होते. मा.शुक्लसाहेब आमचे डेप्युटी इंजिनियर होते. ते तीनचार वर्षांपूर्वी कालवश झाले.)
- वि. म. मराठे, पद्मश्री, विश्रामबाग, सांगली (मो.९४२०६७८९६५)

Comments
Post a Comment