Skip to main content

padmakar kelkar


 ब्राईट स्टार  
श्री. पद्माकर केळकर यांनी गव्हर्मेट कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे येथून १९७२ साली प्रथम वर्ग विशेष प्राविण्यासह बी.ई.(इले.अॅन्ड टेलीकम्युनिकेशन) आणि १९७४ साली प्रथम वर्गात एम.ई. ही पदवी संपादन केली. यानंतर काही काळ त्यांनी अडवानी अर्लिकॉन कंपनीत काम पाहिले व त्यानंतर त्यांनी टाटा मूलभूत अनुसंधान संस्था (ढरींर खपीींर्ळींीींश ेष र्ऋीपवराशपींरश्र ठशीशरीलह) या संस्थेत काम सांभाळले.
काही वेगळे करावे या उद्देशाने त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. सुमारे ३० वर्षांपूर्वी `ब्राईट स्टार्स इलेक्ट्नॅनिक्स' या नावाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. आणि स्वत:चे नाव कमविलेे आहे.
परदेशातल्या प्रवासात श्री.केळकरांनी तेथे मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणाऱ्या `स्वयंचलित फिरते तुषार सिंचन' संचाचा अभ्यास केला आणि अशा प्रकारचा संच हा आगामी काळात भारतात शेतीसाठी खूपच उपयुक्त ठरेल असे वाटून, त्यांनी सौर उर्जाचलित फिरती तुषार यंत्रणा विकसित केली आहे.
 तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची फवारणी करते. या यंत्रणेचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे `पाण्याचे सुयोग्य व परिपूर्ण नियोजन'. पिकाच्या आवश्यकतेनुसार, सध्याच्या भारनियमनाच्या काळातही पिकांना सुयोग्य आणि पर्याप्त पाणी देण्याची सोय या यंत्रणेद्वारे झाली आहे. तसेच या यंत्रणेच्या माध्यमातून पिकांवर कीटकनाशक, खते आणि तणनाशके यांची फवारणीसुद्धा केली जाऊ शकते. या यंत्रणेच्या वापराने जमिनीचा कस कमी होणे, धूप होणे इ. हानी होत नाही. अशा प्रकारची यंत्रणा सध्या भारतात कोठेही वापरली जात नाही. पण भविष्यकाळाचा विचार करता हीच यंत्रणा आपणास पुरेपूर उपयुक्त होईल असा केळकरांना विश्वास वाटतो. ही यंत्रणा प्रयोगादाखल राजगुरूनगर येथील राष्ट्नीय कांदा व लसूण संशोधन संचालनातील प्रक्षेत्रावर बसविली आणि या प्रयोगाचे निष्कर्षही समाधानकारक आहेत. या यंत्रणेचा वापर कांदा, लसूण, बटाटा, गहू इ. पिकांसाठी होईल. या  तंत्रज्ञानावर केळकरांनी दोन पेटंटसाठी अर्ज केेलेला आहे. या संदर्भात त्यांचे देश व परदेशातही अनेक ठिकाणी पेपर वाचले व गौरविले गेलेले आहेत. या प्रणाली संदर्भात  `इनोव्हेशन २००८' मध्ये त्यांना गौरविण्यात आले आहे. तसेच श्री. केळकर  र्आीींेारींळेप ेष ऊराी । लरपरश्री मध्येही  कार्यरत आहेत. देशविदेशांत त्यांनी यासंदर्भात पेपर्स वाचले आहेत. तसेच त्यांनी तीन निरनिराळया पेटंटसाठीही अर्ज केले आहेत.
(`समवेत' )
पत्ता : श्री. पद्माकर केळकर
४३/२, एरंडवणा,  ऑफ कर्वे रोड, पुणे ३८
झह.(०२०) २५४३०७६८, २५४६१००७

Comments