Skip to main content

about pressure cooker


प्रेशर कुकरचा योग्य वापर
इंधन (गॅस) आणि वेळ वाचवून अन्न चांगले शिजविण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात. पहिली व पुढील प्रत्येक शिटी होण्याच्या वेळी कुकरमध्ये दाबाखाली असलेल्या वाफेचे तापमान साधारणपणे ११५ अंश सेल्सियस असते. हे तापमान अन्न चांगले आणि कमी वेळात शिजण्यास मदत करते. ज्यावेळी आपण मुद्दाम शिटी किंवा शिट्ट्या करून इतक्या तापमानाची गरम वाफ बाहेर घालवितो, त्या प्रत्येक वेळी ही वाफ तयार करण्यास लागलेला गॅस आपण फुकट जाळत असतो. म्हणजेच तीन शिट्ट्या करावयास समजा दोन मिनिटे लागत असतील तर दिवसातून दोन वेळा म्हणजे चार मिनिटे म्हणजे महिन्याची १२० मिनिटे, म्हणजेच दोन तास कारण नसताना गॅस जळत असतो. कुकरवरील शिटी होण्याची सुविधा ही शिट्या `करण्यासाठी' नसून आपत्काळात त्या `होण्यासाठी'आहे याची नोंद घेणे आवश्यक आहे.
प्रेशर कुकरचे कार्यतत्त्वच मुळी `दाबाखाली असलेल्या वाफेच्या वाढीव तापमानाचा उपयोग करणे हा आहे' ज्यावेळी आपण शिट्या करून दाबाखालील गरम वाफ (ज्यामुळे अन्न लवकर शिजणार आहे) बाहेर घालवितो त्यावेळी आपण प्रेशर कुकरच्या कार्यतत्त्वाविरुद्ध (स्टीम अंडर प्रेशर) आणि `प्रेशर  कुकर' या नावाविरुद्ध कार्य करून तीन किंवा अनेक शिट्या होण्यासाठी जळणारा गॅस वाया घालवीत असतो. अवैज्ञानिकदृष्ट्या प्रेशर कुकरचा वापर केल्यास सर्वसाधारणपणे प्रत्येक सिलेंडरमागे २० टक्के गॅस फुकट जात असावा असा अंदाज आहे. म्हणजे प्रत्येक सिलिंडरमागे ८० रु.चा गॅस वाया जातो. गॅसवर मिळणाऱ्या सरकारी अनुदानासह देशपातळीवर विचार केल्यास हे नुकसान करोडो रुपयांत असावे.
हे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी आपणाला वेगळे असे काहीच करावयाचे नाही. फक्त दाबाखालील गरम वाफेचा शिटी न करता उपयोग करणे हाच उपाय आहे. त्यासाठी खालील दोन बाबींवर आग्रहपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे -
१) नेहमीप्रमाणे कुकर लावा. परंतु सुरुवातीपासून गॅस एकदम बारीक म्हणजे सिमवर ठेवून अन्न शिजण्यास वेळ द्या.
२) अशा स्थितीत जेव्हा पहिली शिटी होईल असे वाटेल त्यावेळी, (शिटी होऊ न देता) गॅस बंद करा आणि नेहमीप्रमाणे खूप वेळानंतर कुकर उघडा.
कडधान्यासह कोणताही शाकाहारी पदार्थ पूर्णपणे शिजलेला मिळेल. मांसाहारी पदार्थांसाठी संबंधितांनी अनुभव घ्यावा. अन्नाच्या चवीत चांगला गुणात्मक फरक पडतो काय याकडे लक्ष ठेवा.
आपणाला वरील सर्व बाबतीत सकारात्मक फरक आढळल्यास देशहितासाठी आपला अनुभव इतरानंा सांगा.
- डॉ.जगदीश सदाशिव सरदेशपांडे, पुणे (मोबा.९२७०१०६०५०)
संकलन : जस्मिन केळकर

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...