Skip to main content

Posts

15 & 22 April 2019

उदारमतवादी  हिंदू  विचार भारतातले बहुसंख्य लोक हिंदू आहेत. हिंदू हा रिलिजन या इंग्रजी शब्दाच्या अर्थाने `धर्म' नाही. सुप्रीम कोर्टाने हिंदू हा धर्म नसून जीवनपद्धती आहे, असा निर्णय दिला. धर्म या संस्कृत शब्दाचा अर्थही रिलिजन या शब्दापेक्षा वेगळा आहे. आपण सहजपणे म्हणतो, `सुगंध देणे हा फुलाचा धर्म आहे!' याचा अर्थ धर्म म्हणजे सहजपणे आणि नैसर्गिकरित्या वागणे असा आहे. आपल्याकडे देवांची अनेक रूपे आहेत, अनेक तीर्थक्षेत्रे आहेत आणि अनेक धार्मिक ग्रंथ आहेत. याचाच अर्थ असा की, आपल्या धर्मात कशा प्रकारे देवाची पूजा करावी, अध्यात्माचे पालन कसे करावे, याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. तसेच या धर्मामध्ये सहिष्णू आणि उदार विचारांची परंपरा आहे. त्यामुळे एकपत्नी व्रताचे पालन करणारा रामही आापला देव आहे, आणि युद्धानंतर एका विशिष्ट परिस्थितीत हजारो स्त्रियांचा पती होणारा कृष्णही आपला देव आहे. आपण आपल्या देवाला वेगवेगळया प्राण्यांच्या आणि झाडांच्या रूपातही पाहतो, त्यांचीही पूजा करतो. तसेच आपण दुसऱ्या धर्माचा आणि पूजा पद्धतींचा आदरही करतो. कारण आपल्याला आपल्या धर्मानेच तसे शिकवले आहे. िख्र्चाश्ॅनिट...

7 Feb. 2019

जुने, जुनाट, की पोक्त आपसूक पडलं न् दंडवत घडलं! -अगदी इतक्या सहज ही चाळीशी मागे पडली नाही, आणि `बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे' इतके झोकून देणेही जमले नाही. परंतु हा अजब योग साधला हे मात्र खरे! सांगली जिल्ह्यातल्या -तशा एका आडभागातून विचारप्रसारण करीत राहण्यातून हे कार्य घडले. मनाच्या एका कोपऱ्यातलं सांगायचं तर, आमच्या शर्क्तिेंुद्धीच्या मानाने एवढे जीवितकार्य मानून समाधीसुद्धा घ्यायला हरकत नाही! केवळ मोजमापात बोलायचं तर, चाळीस वर्षांतले सरासरी चाळीस प्रमाणे सोळाशे इतके केवळ संपादकीय लेख म्हटले तर, पुस्तकाच्या आकारात चार-पाच हजार पृष्ठे होतील!! हे कसे घडले? घडले खरे!! -परंतु ही काही भावार्थदीपिका नव्हे. आहे साधी पणती. स्नेहरज्जूंची वात शाबूत आहे, आणि कठोर प्रयत्नांनी वाळूचे कण रगडिता तेलही गळे; अशी उमेद आहे तोवर ती पुढे तेवत ठेवायची आहे. येत्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीचे, विकृत समाजमाध्यमांचे, संकुचितपणाचे तोटे आपल्या समाजाला कळू लागतील आणि पुन्हा एकत्र सहजीवनाकडे वळावे लागेल अशी शक्यता आहे. व्यक्तिेनष्ठ व प्रादेशिक अस्मितेच्या राजकीय पक्षांची मोजदादही कठीण झाली, अशा या...