Skip to main content

Posts

24 Feb & 4 March

उद्याच्या प्रशासकांना आव्हाने अुत्तराखंडमधील मसुरी येथे लालबहादुर शास्त्री राष्ट्नीय प्रशासन अकादमी आहे. तेथे महाराष्ट्नचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली, त्यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.  प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिका व जबाबदारी, प्रेरणास्रोत, भावी काळातील तंत्रज्ञान व त्याची आव्हाने आित्यादी विषयांवर त्यांनी भाष्य केले. त्याचा स्वैर अनुवाद जयश्री देसाआी यांनी `लोकराज्य'साठी केला, तो संक्षिप्त रूपात सादर - आिथं यायला मिळावं, शिकायला मिळावं अशी आिच्छा माझ्या मनात कायमच होती. तुम्हाला कल्पना असेलच की, प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थी, अेक ना अेक दिवस आिथं यायला मिळेल असं स्वप्न पाहात असतो. परंतु तुमच्यासारखे काही विद्यार्थीच आिथे प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात. या प्रबोधिनी (अॅक्रॅडमी)च्या संचालक श्रीमती अुपमा चौधरी यांचे मी विशेष आभार मानू आिच्छितो, कारण त्यांनी मला या वेगळयाच निमित्तानं आिथं थेट प्रवेश दिला. वास्तविक मला तरी आिथं बराच काळ व्यतीत करायला आवडलं असतं, आणि आिथल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात राहायलाही आवडलं अ...

28 Jan 2019

नवतेचा सांधा प्राचीनाशी जुळूदे ! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांचा, पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये सत्कार करण्यात आला. भारतीय प्राचीन संस्कृतीत, विविधता असली तरीही तिच्यातील समन्वय आणि सर्वसमावेशकता, संशोधनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न ज्येष्ठ संशोधक, अभ्यासकांनी नेहमीच केलेला आहे. हाच धागा पकडून, प्राचीन मौलिक साहित्याचा  नवतेशी सांधा जुळण्यासाठी, अभ्यासकांची सर्वसमावेशक भूमिकाच आधुनिक काळात महत्वाची ठरणार असल्याचे मत अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. या भूमिकेची गरज लक्षात घेऊन त्यांच्या प्रतिपादनाचा हा संपादित अंश - महासमन्वय हे सर्वच विद्वत्जनांचे सूत्र असते. प्राचीन संचित लाभलेल्या आपल्या भूमीत अनेक विचारधारा, प्रवाह निर्माण झाले. विद्रोह झाला, चळवळी झाल्या, आक्रोश झाले. या सगळयांना समजून, सामावून घेत संस्कृतीचा प्रवाह पुढे जात राहतो. ही संस्कृती कल्याणकारी करणे, मानवकेंद्री करणे, आणि मानवतेला पोषक अशी मूल्ये अधोरेखित करीत जाणे; त्यांतून संस्कृतीचा विकास घडवणे हे काम आपल्या विचारवंतांनी, ज्ञानवंतांनी आणि संशोधक अभ...

21 Jan 2019

वंशावळीचे जतन करणारा हेळवी समाज आपण कोण, कुठून आलो याबद्दलची अुत्सुकता प्रत्येकाला असते. लग्नाकार्यात किंवा वाडवडिलांच्या पुण्यकर्मावेळी पुरोहित, आधीच्या दोन तीन पिढ्यांची, पितामह-मातामहांची नावे विचारतात, त्यावेळी प्रत्येक कुटुंबात जराशी पळापळच अुठते. तेवढ्यापुरती कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती ती माहिती पुरविते परंतु नंतर मात्र आपली आपल्यालाच खंत वाटू लागते, `काय हे? आपल्या आधीच्या अेकदोन पिढ्यांतले नावही आपण सांगू शकत नाही!! पूर्वजांची कीर्ती कसली सांगावी?....' मग शोधाशोेध सुरू होते. आपले मूळ कुठले, मूळ स्थान कुठले, स्थलांतर कसे झाले, कशासाठी झाले,  आपण कुठून आिथे येअून पडलो... वगैरे. कुलदैवत खुणावू लागते, तिथे अेकदा जाअून यायला हवे असे वाटू लागते. धर्मक्षेत्री कुलोपाध्यायाकडे विचारले जाते, तिथल्या नोंदी पाहून कुलवृत्तांत घरी येतो, आपल्या आधीची नावे पाहून शेवटी अेकदाचे आपले नाव तिथे नोंदल्याचे समजले की तेच कुलावृत्तांताचे पुस्तक - बाड आपल्याला फारच पवित्र वाटू लागते. ब्राह्मण समाज लिहिता वाचता असला तरी, -`पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन...' अशाच वृत्तीचा असतो. त्यामुळे अशी वंश...

14 Jan 2019

जन्मशताब्दीच्या निमित्ताने आठवणी बाबूजींच्या आयुष्यात काही भाग्ययोग जुळून येतात, मी भाग्यवान खरंच, पुणे आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करताना पंडित भीमसेन, जितेंद्र अभिषेकी, गजाननराव वाटवे, मणिक वर्मा, मालती पांडे, ज्योत्स्ना भोळे अशा नामवंतांच्या मुलाखती, निर्मितीची संधी मिळाली. परंतु सुवर्णसंधी म्हणावी अशी घटना म्हणजे बाबूजी सुधीर फडके यांच्या कार्यक्रमाची निर्मिती आणि त्या निमित्ताने त्यांच्या मयूरपंखी सहवासाची. २००२सालच्या फेब्रुवारी महिन्यात आकाशवाणीच्या सभागृहात हा योग जुळून आला. बाबूजी १५ मिनिटे आठवणी सांगणार होते. प्रत्यक्ष त्यांनी ९० मिनिटे आठवणींना उजाळा दिला माझे वडील पुण्यातील `ललकार' ध्वनिक्षेपण संस्थेचे नानासाहेब आपटे. बाबूजींशी त्यांचा स्नेह माझ्या जन्मापासून (साधारणपणे १९४२ नंतरचा). सदाशिव पेठेतील आमच्या घरासमोर गजाननराव वाटवे राहत असत, बाबूजी त्यांच्या घरी येत. त्यांच्यामुळे बाबूजी व नानांची मैत्री झाली, तिघांचे सूर जमले. ध्वनिमुद्रिकांची लायब्ररी हा अभिनव उपक्रम नानांनी `ललकार' नावाने सुरू केला. उद्घाटनाच्या दिवशी गजानन वाटवे, बबनराव नावडीकर, कुमु...