Skip to main content

Posts

8 august 2016

इंग्रज येण्यापूर्वी भारतातील शिक्षण -वा. ना. उत्पात     आपल्या देशात आज जी शिक्षण पद्धती आहे, ती सर्व इंग्रजांनी लादलेली आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, अभियांत्रिकी, वाणिज्य, कला, वैद्यकीय पदव्यांची नावे, ही सगळी रचना ब्रिटीशांनी केलेली आहे. इंग्रज येण्यापूर्वी या देशात काही शिक्षण व्यवस्था होती का? की आम्ही जंगलात राहत होतेा? झाडाच्या साली पांघरत होतो? आम्हाला रामायण महाभारतातील गुरुकुले, नालंदा, तक्षशीला विद्यापीठे माहीत आहेत, पण इंग्रज येण्यापूर्वी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था काय होती? काही इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या नोंदी केल्या आहेत. त्यातील अॅडम फर्ग्युसन, विल्यम रॉबर्टसन, जॉन फ्लेफेर, ए मॅनोशी हे काही विद्वान आहेत. पुष्कळ राजकारणी, धूर्त इंग्रज विद्वान हे भारतीय संस्कृतीचे विकृत चित्रण करीत होते. त्यातून भारतीय संस्कृतीला शिव्या देणारी, इंग्रजाळलेली पिढी निर्माण झाली. तथापि काही ज्ञानपिपासू इंग्रज विद्वान येथील सर्व व्यवस्था, विद्या यांचा अभ्यास करीत होते. एका इंग्रजाने फर्ग्युसनला विचारले `याचा उपयोग काय?' त्यावर फर्ग्युसन म्हणाला, `भारतातील सामान्य व्यक्तीदेखी...

2 august 2016

ज्ञातीचे संघटन ज्ञातीअंतासाठी कोणत्याही सामाजिक विषयाची चर्चा सुरू झाली की  ती आपल्या जाती-व्यवस्थेशी येते. त्या मुद्द्यावर ती पेटू लागते. आणि जो तो आपापल्या जातीची बाजू घेअून आितरांच्या जातीवर तुटून पडतो. शिक्षण, सांस्कृतक संबंध, व्यवसाय, आचार विचार अशा बाबतींत जातींचा विचार होतोच; पण राजकारण हे तर अशा विचारांच्या आधारानेच वाढत असते. जातीचा विचार करावा की नको, असा मुद्दाच नाही. जातीभेद पाळू नये हे तर निश्चितच आहे. तसा तो  न पाळणारे जे जातीसमूह किंवा कुटुंबे आहेत त्यांनाही आितरांकडून त्याच भेदांचे विदारक अनुभव येतात. पूर्वीच्या गावगाड्यात ब्राह्मण समाजाने काही व्रताचरण सांभाळूनही जातीभेद नाहीसा करण्याचे, न पाळण्याचेच धोरण ठेवलेे होते; तरीही त्याला गेल्या अर्धशतकात बरेच भोगावे आणि सोसावेही लागले आहे. जातीअंतासाठी म्हणून जे कोणी प्रयत्न करत असतील, त्यांचे स्वागत केलेच पाहिजे, पण ते प्रयत्न निर्लेप मनाने न होता त्यातही पुष्कळदा जातीभेदातून अुद्भवणारा दंभ असतो हेे सहज ओळखू येते. आंतरजातीय विवाहांचा स्वीकार आजकाल ज्या समाजाने सर्वाधिक केलेला आहे,  त्याचाही गैरअर्थ काढून, त...

25July 2016

आपले जग अंकातील मजकूर तुम्हांस आवडेलच  तो इतरानांही पाठवावा. जनतेवरचे अत्याचार थांबवा नगर जिल्ह्याच्या अेका खेड्यातील मुलीवर अतिप्रसंग झाला, आणि तिला क्रूरपणे मारून टाकले. हे सगळे अघोरी, अमानवी घडले. त्या आरोपींना अशी शिक्षा व्हायला हवी की, त्यामुळे कोणतेही लहानमोठे गैरकृत्य कुणाकडूनही कधी घडूच नये. ती शिक्षा काय असावी हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयाला असतो. कोणतीही कठोर शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालय त्या प्रकरणाचा सांगोपांग विचार करेल. त्या साऱ्या व्यवस्था-प्रक्रियेवर प्रत्येकाचा  ठाम  विश्वास असलाच पाहिजे. ती प्रक्रिया पार पाडायची तरी व्यवस्थेची काही पथ्ये पाळावी लागतात. अुगीच कुणी तरी विखे पाटील किंवा राणे म्हणतात, किंवा कुणी मोर्चा काढून मागणी करतात म्हणून धरला आरोपी  -की चढव फासावर; असे होत नसते. त्याच दीर्घकालीन  -पण अटळ न्यायिक प्रक्रियेचा गैरफायदा हीच आक्रस्ताळी राजकारणी माणसे स्वत:साठी घेतही असतात; अन्यथा त्यांच्या भ्रष्टाचारांच्या आरोेपांवरून लोकांच्या न्यायाने कधीचीच जोडामारी झाली असती. कायदा सुव्यवस्था ठीक नांदते आहे, म्हणून ते अजूनी घडत नाही, हे...

11 July 2016

संपादकीय मंत्र्यांना कामी लावावे केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार आणि खातेपालट झाला आणि राज्यातही तो विधी अेकदाचा पार पडला. पंतप्रधान मोदींनी लगेचच नव्या मंत्र्यांना जबाबदारीचे भान दिले, आणि संसदेचे सत्र तोंंडावर असल्याने त्याची परिपूर्ण तयारी करावी असेही सांगितले, शिवाय १५ऑगस्टपर्यंत आपापल्या गावाकडे जाण्याची तत्परता दाखवू नका, हेही सुनावले. राज्य स्तरावरही त्याच सूचनांचा अंमल व्हायला हवा, पण प्रत्यक्ष तसे कोणकोण वागले हे आपण जाणतोच आहोेत. मंत्रीपद घेअून गावच्या गल्लीत मिरवायचे असते, अेवढेच ज्यांना माहीत आहेे, त्यांचीच आपणा जनतेलाही सवय झाली आहे. फार तर त्या मंत्र्यापुढे आापल्या शेपट्या हलवत अुभारावे, आणि त्याचा कृपाकटाक्ष घडला तर धन्य व्हावे, अशी आजवरची रीत बनली आहे. आपल्या पोराला नोकरी किंवा काहीतरी तत्सम लाभाचे काम असेल तर मधल्या चमच्याला,  त्या मंत्र्यांचा जावआी-पुतण्या अशा कोणाला तरी गाठण्याशिवाय  पर्याय नव्हता. अशा रराज्यकारभाराचा कितीही अुबग आला तरी तो सहन करण्यातच आधीच्या पिढीची हयात सरली. सत्ताबदलाचे परिणाम असोत, तरुण जनता क्रियाशील झाल्यामुळे असो, किंवा माहिती त...

20 June 2016

'Aple Jag' ankatil sampadakiy, anya Majkur tumhala avdlyas etarana pathavava. संपादकीय सद्रत्नहार मणि ताइत बाहुदंडी कीं स्नान चंदनफुले आणि लांब शेंडी यांनी खरी घडतसे पुरुषा न शोभा वाणीच भूषण सु-शिक्षित-शब्दगर्भा ।।-वामनपंडित (भर्तृहरीचे नीतीशतक) अपात्रतेचे बोलणे भारतीय रीझर्र्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे लवकरच पदावरून दूर होत आहेत. शासकीय नोकरी किंवा पद, त्याच्या विहित मुदतीनंतर संपवून खुर्ची खाली  करावी लागते. छोट्या-मोठ्या  संस्था व आस्थापनांमध्ये जेव्हा संचालक मंडळ बदलते, तेव्हा प्रशासकीय यंत्रणेतील माणसे बदलली किंवा गरजेनुसार कमीही केली जातात. यात काही गैर मानायचे नसते. आपल्या धोरणानुसार चालणारे प्रशासन असावे, यासाठीच तर लोकशाही मार्गाने सत्ताबदल करायचा असतो. जुनीच धोरणे, जुनीच पद्धत, जुनेच अधिकारी असे ठेवायचे असेल तर आटापिटा करून सत्ताबदल करायचाच कशाला, हा सरळ साधा व्यवहार आहे. पण आपल्या माध्यमांची रीत अशी की, नव्या मुख्यमंत्र्याने आपला सचिव बदलला तरी ती मनमानी असल्याचा कांंगावा होतो; शिवाय तीे बाजूला गेलेेली व्यक्ती किती कर्तबगार होती, याचे पाढे वाचले जाऊन अशा ...

20 June 2016

संपादकीय उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करूं नको बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्री नको ।-अनंत फंदी भूक पोटाची अन् डोक्याची  गेल्या पंधरवड्यात साधारण अेकाच वेळी अेकाच राजकीय पक्षाच्या संदर्भात दोन बातम्या प्रसिध्द झाल्या. राष्ट्न्वादी काँग्रेस पक्षाने १६वर्षे ओलांडली त्या निमित्ताने श्री.शरदराव पवार यांचे मनोगत व्यक्त झाले आहे, आणि त्याचवेळी त्यांच्या पक्षाच्या सांगलीतील मेळाव्यात जेवणाच्या नियोजित वेळेअैवजी असह्य अुशीर झाल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांची झुंबड अुडून खुर्च्यांची फेकाफेक झाली, त्यात काही गंभीर जखमी झाले, अशीही बातमी आहे. श्री.पवार यांनी सोेळा वर्षांपूर्वी सोनिया गांधींशी फारकत घेअून वेगळी चूल मांडली, पण त्या चुलीवर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काही पाकसिध्दी न होता केवळ धूर  महाराष्ट्नत  कोंदटून गेला हे तर सगळयांनाच कळून चुकले आहे.  तरीही त्यांच्याअेवढी राजकीय स्थितीची जाण आणि लोकांची नस माहीत असलेला नेता महाराष्ट्नत तुरळकच असेल ही त्यांची प्रतिमा आहे. पण त्यांच्या पक्षाचे नाव भ्रष्टाचाराच्या संदर्भात अुच्च स्थानी आहे हे त्यांनीही आडवळण...