Skip to main content

Posts

25 april 2016

भारतीय चित्रपटाचा युगारंभ                              -बापू वाटवे       १८८९ हे चलत् चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अतिशय महत्वाचे वर्ष आहे. मुंबईचे हरहुन्नरी इंजिनियर मदनराव माधवराव पितळे हे श्रीकृष्णाच्या जीवनातील काही भाग स्लाईड्वर चितारून हौस मौज म्हणून मॅजिक लँटर्नच्या साहाय्याने दाखवीत. त्याने चलचित्रपट पाहात असल्याचा भास होत असे. हा व्यवसाय होऊ शकेल ही कल्पना कल्याणच्या महादेव गोपाळ पटवर्धन यांना सुचली. त्यांनी एक जुनाट मॅजिक लँटर्न मिळविला, त्यांचा ज्येष्ठ पुत्र विनायक याने चित्रे रेखाटण्याची व अशा चित्रांतून मॅजिक लँटर्नच्या साहाय्याने चलत् चित्राचा आभास निर्माण करण्याची अशा दोन्ही कला आत्मसात  केल्या. हस्तगत झालेली कला रसिकांसमोर सादर करण्याची संधी पटवर्धन पितापुत्रांना लवकरच मिळाली. आपल्या खेळाला त्यांनी `शांबरिक खरोलिका' असे नाव दिले. `शांबरिक' म्हणजे मॅजिक, `खरोलिका' म्हणजे लँटर्न. मॅजी म्हणजे शांबरासुर त्यावरून शांबरिक असा सुटसुटीत शब्द बनविला.लँटर्नला आपण दीप, दिवा असं म्हणतो....

11 april2016

संपादकीय ।।तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख-दु:ख जीव भोग पावे।। आम्ही ' व `ते'   थांबवूया डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीची चाहूल असतानाच हीन जातीय राजकारणाचे प्रसंग वारंवार येतात. बाबासाहेबांनी सोसलेली अवहेलना, अपमान व अनेक प्रतिकूलतेतूनही सतत प्रज्वलित ठेवलेला ज्ञानाग्नी पाहून आश्चर्य वाटते.एखाद्या सामान्याचे व्यक्तिगत उन्नयन पिचत दिसतेही पण व्वक्तिगत आकांक्षा, पैसा, पत, प्रतिष्ठा किंवा राजकीय महत्वाकांक्षा न ठेवता समाजालाही आपल्यासारखेच बनवायचे ही जीवनधारणा असणे हे बाबासाहेबांच्या कार्याचे वैशिष्ट्य. ज्या समाजाने आपल्याला हीन लेखले त्याही समाजाचा द्वेष नाही. म्हणून त्यांना ``महामानव'' हे सार्थ बिरूद लाभले. आज कु णी त्यांच्या मार्गावरून चाालण्याची इच्छा करत असेल तर त्याला प्रथम जातीय अभिनिवेश, विद्वेश, राजकारण, वैयक्तिक स्वार्थ याला तिलांजली द्यावी लागेल. आज दुर्देवाने त्यांचा वैचारिक वारसादेखील मूठभर विचारवंताना आंदण दिल्यासारखे वर्तन चालू आहे. बाबासाहेबांना ``दलितांचे कैवारी'' म्हणून संबोधणारे त्यांचे अनुयायी त्यांची वैचारिक  उंची शतांशानेही गाठू शकल...

4 april 2018

संपादकीय आंधळयासी जन अवघेचि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाही ।  रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाही । तुका म्हणे शुद्ध नाही तो आपण । तया त्रिभुवन अवघे खोटे ।।   गेल्या ११-१३ मार्च ला दिल्लीत श्रीश्री रविशंकर जी यांच्या `जगण्याच्या कले'चा महामहोभव्य मेळावा भरला होता. त्या निमित्ताने लक्षावधी लोक दिल्लीच्या यमुनातीरी जमले, त्यांनी काही सांस्कृतिक कार्यक्रम केले, प्रवचने केली, सीताराम सीताराम चा जप केला, अध्यात्मदर्शन घडवले. भारतीय संस्कृती फार महान असल्याचा नवा साक्षात्कार साऱ्या जगाला या महामेळाव्याने झाला असेल तर माहीत नाही. त्यांच्या या मेळाव्याचा जो काही उद्देश असेल तो यशस्वी झाला असावा अशी सदीच्छा दूर बसून करायला हरकत नाही. एक तर इतक्या मोठ्या प्रमाणावर साऱ्या जगभरातून लोक एकत्र आणणे हीच कठीण गोष्ट आहे. त्यांची सारी व्यवस्था करणे हे तर आव्हानच.  तसा काही स्वार्थ नसताना इतक्या संख्येने लोक आपापला कामधंदा सोडून येतात त्यामागची प्रेरणाही अजब आहे. आपल्याकडे यात्रा जत्रा किंवा अगदी मोदी-सोनियांच्या सभांनाही माणसे दिवसच्या दिवस घालवून उन्हापावसात ग...

28march

विनिमयाचे हितकर व्यवहार गोष्ट तशी जुनीच आहे, ग्रामीण भागातल्या कोणत्याही दवाखान्यात घडणारी! एका रुग्णाईत वृध्देला तपासल्यावर औषध घ्यायला सांगितले, पण ते घेण्यासाठी तिच्याकडं पैसे नव्हते. मग मीच तिला काही पैसे देऊ केले, पण ती तेही घेण्यास तयार होईना. आपल्या म्हातारपणाचा उल्लेख करत ती म्हणाली, ``आता देणा शिल्लक रवतां नये. मी मेलंय तं तुमचा देणा फेडतलो कोण?'' तिच्या प्रांजळपणामुळं मलाही ते पटण्याजोगं होतं. प्रश्न पन्नास-शंभर रुपयांचा नव्हता, पण कोणाची उधारी करणं, उपकाराच्या ओझ्याखाली राहणं त्या खेडूतांना तर नको असतं ना!  मी तिचा चरितार्थ कसा चालतो ते विचारलं, तेव्हा कळलं की नारळीच्या झावळयांचे हीर काढून ती केरसुण्या वळून देण्याचे काम करते. बसल्या जागी तिला हे काम होऊ शकतं. आपलं औषधपाणी सुध्दा सन्मानानं खरेदी करता यावं यासाठी धडपडणारी ती आजी पाहून मला मोठीच प्रेरणा मिळाली.यापूर्वी मी स्वदेशी जागरण मंचाचे राजीव दीक्षित यांची व्याख्याने, सीडीज् ऐकलेले होते. प्राचीन काळी वस्तूविनिमय पध्दतीने व्यवहार चालत असत त्याचे  समाजधारणेतील मोल मला एकदम त्यावेळी आठवले. आपापले श्रम अथवा उत्...

14 march 2016

बेने इस्त्रायल - नोेहा मस्सील इसवी सनाच्या पूर्व ५८६मध्ये बाबिलोनच्या राजाने जेरुसलेमवर स्वारी केली, आणि ज्यूंची धर्मस्थळे उध्वस्त केली. पुढे इराणच्या शहाने जेरूसलेम जिंकून घेतले व ज्यूंना पुन्हा प्रार्थनामंदिरे बांधण्याची परवानगी दिली. त्याच्या राज्यात ज्यू समाज सुखाने नांदला. काही शतकांनंतर टायटस या रोमन सरदाराने जेरुसलेम पुन्हा जिंकले, त्याने ज्यूंची मोठ्या प्रमाणात कत्तल केली. त्यातून जीव वाचविण्यासाठी असंख्य ज्यू वाट फुटेल तिकडे पळत राहिले. काही युरोपमध्ये गेले, काही मध्यपूर्वेला पळाले. काही ज्यूंना त्यांच्या दर्यावर्दी पेशामुळे व व्यापारामुुळे भारत माहीत होता. असे लोक छोट्या मोठ्या गलबतांत बसून भारताकडे निघाले. तथापि हे त्यांचे भारताकडे निघणे ठरवून होते की समुद्रातील प्रवाहांमुळे घडले, याबाबत आज कसे कोण सांंगू शकणार?      त्यांचा प्रवास महाखडतर असणार हे तर नक्कीच आहे. त्यात अनेकांची गलबते फुटली, कित्ेकांना जलसमाधी मिळाली.जे कोणी वाचले किंवा अर्धमेले  झाले होते, ते भारताच्या पश्चिम किनारी कोकणातील अलीबागजवळ  चौल (नौगाव) बंदराशी लागले.  सुदैवाने जि...

7 march 2016

कूळकायद्याचे तीन तेरा महाराष्ट्नत १९५६ साली कूळकायदा लागू झाला. हा कूळकायदा येणार म्हणून जमीन मालकांनी काही कायदेशीर फेरफार करून, जमीनीच्या वाटण्या करून, कूळकायद्यापासून बचाव केला, पण ज्यांनी असे केले नाही, कुळांनी दिलेल्या शब्दावर विसंबून राहून त्याच्याकडून नोकरनामा लिहून घेऊन भरवश्यावर राहिले, ते तिथेच फसले. कारण ती जुन्या वळणाची माणसं, शब्द दिल्यावर विश्वास ठेवणारी! जे कूळ त्यांच्या वाडवडिलांपासून जमीन कसत होते त्यांनी शब्द दिला.पण त्या कुळास आजूबाजूच्या जमीन मालकांनी फिरवले, त्यांना पुढाऱ्यांनी सांगितले की `सरकार तुमच्याकरता कायदे करीत असताना तुम्ही त्याचा फायदा घ्या.' त्यांनी दिलेला शब्द फिरवण्यास वारंवार सांगून भाग पाडले. मग कुळे कायदेशीर जमीनमालक झाली. कित्येक  मूळ मालकांनी त्यावेळी साठी गाठली होती. हातची जमीन गेली याचा धक्का बसून काही विकलांग झाले, काही मालक खलास झाले. त्यावेळची त्यांची स्थिती फार हलाखीची होती. घरात धान्य नाही, आयुष्य शेतीवर अवलंबून असल्यामुळे नोकरी केली नाही, त्यांना कोर्टात जाणेसुद्धा जमले नाही! इकडे कुळे मालक झाली. एकदोन वर्षे कशीतरी शेती केली. पुढे...