Skip to main content

Posts

sept.2015

सुशासन की अनुनय दहीहंडीच्या निमित्ताने काही वादविवाद झाले, कोर्टबाजी झाली, त्यांचा थोडासा परिणाम झाला. तथापि धार्मिक उत्सवांच्या नावावर जी झुंडगोंधळाची लाट यायची ती आलीच. असल्या प्रकारांमुळे गावे-शहरे सर्वार्थाने प्रदूषित होत असताना, त्यांच्या खेळांत आमदार-खासदार पुढाकार घेत असल्याचे पाहून हसायचे की रडायचे? नगरपालिका, प्रशासन, नियम-कायदा, पोलिस, न्यायालय इत्यादी सगळया घटनात्मक यंत्रणा कोलून लावणाऱ्या लोकांवर कोण, कसा वचक ठेवणार आहे? राज्यघटना व त्याआधारे अस्तित्त्वात आलेले नियम झुगारून देणारे पुढारी, तोंड वर करून पुन्हा आंबेडकर-शाहूंचे नाव घेतात हे अजब आहे. सरकाराला तर हल्ली नको ती कामे अंगावर ओढवून घेण्याची कंड सुटली असावी. साहित्य चळवळी, दहीहंडी, गणपती, पंढरीची वारी, पर्युषण, इफ्तार पार्टी यांत सरकारने वास्तविक लक्ष घालू नये. सार्वजनिक जागा, सार्वजनिक पैसा, सार्वजनिक यंत्रणांचे श्रम आणि मुख्य म्हणजे सार्वजनिक कामांचा वेळ यांचा धडधडीत गैरवापर सर्रास चालू आहे. दुष्काळ, नक्षलवाद, विचारवंतांचे खून, मूलभूत सुविधांची टंचाई हे भीषण प्रश्न कोण हाताळणार? राजकीय पक्षही तसल्या आक्रस्ताळया भ...

sept.2015

सामान्यांची घुसमट भाजपने सत्तेवर आल्यानंतर केलेल्या पुष्कळ निवडनियुक्त्या त्रयस्थ व सुजाण विचार करणाऱ्या कित्येकांस खटकणाऱ्या असतील; परंतु राज्यकर्त्यांचा तो अधिकार मानायला नको काय? पूर्वकाळची ढोबळ उदाहरणे कुणालाही आठवतील. काँग्रेसचे बाबासाहेब भोसले, जनता दलाचे देवेगौडा, समाजवादी राजनारायण किंवा आजचे लालूप्रसाद; फारच भीषण म्हणजे राबडीदेवी वगैरे वगैरे! असल्या `नियुक्त्यां'वर या पराभूत परिवारा'ने फारसे तोंड टाकले नव्हते, जेवढे ते आज मोदी किंवा सुषमा स्वराजवर बडबड करत आहेत! बाबासाहेब पुरंदरे यांना `महाराष्ट्न् भूषण' द्यायचा निर्णय या तोंडपाटील मंडळींनी अकारण वादग्रस्त केला. आजवर कुणाकुणाला `भारतरत्न' ते `पद्मश्री'वाटल्या गेल्या ती यादी त्यांनी एकदा डोळयापुढे आणली असती तर त्यांना रडण्यासाठी, किंवा पत्रके काढून माध्यमबाजीने सत्यशोधक विरोध करण्यासाठी किती संधी होती ते त्यांच्याही लक्षात येईल. सध्याच्या सत्ताधारी भा.ज.प.चा कारभार, नियुक्त्या, निर्णय हे सर्वकाही छानछान होईल असे कोणी मानत नाही. किंबहुना गेल्या वर्षभराचे मूल्यांकन कुणी हल्लीच्या शालान्त परीक्षेप्रमाणे काठा...

August 2015 Editions

पालकांनी सर्जनशील व्हावे मुलांच्या अभ्यासाकरिता प्रयत्न जारी ठेवले, त्या प्रामाणिक भावनेला सर्वतोपरी सहकार्य मिळाले, तो माझा अनुभव.... नवनिर्मिती सहज होत नाही, त्यासाठी चिकाटी आणि परिश्रमही लागतात.  ते असतील तर शासकीय यंत्रणेतील भली माणसे पुढे येतात आणि पाठीशी कोणीतरी समर्थ उभा राहतो. त्या अनुभवाची कथा. १९७८सालची गोष्ट. माझा मुलगा पाचवीत होता. त्याच्या भूगोल विषयाच्या अभ्यासाला भारतातील घटकराज्ये, राजधान्या, लोहमार्ग, राजमार्ग, प्रमुख शहरे इत्यादी अनंत प्रकारची माहिती होती. हे सर्व पाठ करून लक्षात ठेवणे तसे पालकांनाही कठीणच होते. परंतु मुलांच्या वयाचा आणि चौकसपणाचा विचार केल्यास ही सर्व माहिती थोड्या रंजक पद्धतीने सांगावी लागेल असे मला वाटले. त्यावरून एक कल्पनाही सुचली. मोठ्या ड्नॅइंर्ग पेपरवर भारताचा नकाशा काढून मी त्यात ही सर्व माहिती दाखवली. राजधानीच्या ठिकाणी मोठा खजिना ठेवलेला असून तो मिळविण्यासाठी काही माणसे (खेळाडू) आपापली आगगाडी लोहमार्गावरून त्या त्या ठिकाणी नेतात अशी कल्पना केली. आगगाडीसाठी एक रंगीत टिकली वापरून हा खेळ मुलामुलांच्यात खेळता येण्यासारखा होता. गटातील...