श्रीपाद जोशी, जत यांचे सावंतपूर वसाहत (किर्लोस्करवाडी) येथे श्री गणेश मंदिरात `गदिमा' या विषयावर अलीकडेच व्याख्यान झाले, त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत. गदिमांना उत्तरायुष्यात मान-प्रतिष्ठा मिळाले तरी त्यामागे पूर्वायुष्यातील खडतर परिश्रम उभे होते याची; तसेच त्यांच्या आयुष्यातील हृद्यतेची जाणीव करून देणारे भाष्य - ....गदिमांचा काळ.... ग.दि.माडगूळकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ला झाला. त्यांच्या मातोश्री बनूताई, आटपाडी तालुक्यातील शेटफळे या त्यांच्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या होत्या. चव्हाणांच्या वाड्यात त्यांचे कुटुंब होते. बनुताइंर्ना प्रसूती वेदना सुरू झाल्या. बनूताइंर्ची प्रसूती झाली, पण जन्मत: बाळाने टॅं%ह करायला हवे, तसे झाले नाही. बाळ मृत जन्मले की काय, या शंकेने तगमग उडाली. परसात खड्डाही खणण्यात आला. रडारड सुरू झाली. तेवढ्यात गावातील एक चलाख सुईण धावत आली. तिने सर्व प्रकार पाहिला, आणि बनूताइंर्ना सांगितले, `तुझी बांगडी फोड.' बांगडी फोडणे सवाष्ण स्त्रीला अशुभ असते. सुईण म्हणाली, `मी सांगते तसं कर!' बांगडी फोडली. फुटक्या बांगडीचे एक टोक पोटात वारेमध्ये खुपसले. वार बाजूल...