Skip to main content

Posts

13Jan2014

` जगातील सर्वात उंच पुतळा' अशी ज्याची ख्याती असेल तो सरदार वल्लभभाई पटेल यांचा  पुतळा गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणापासून ३.२ किमी. वर नर्मदा नदीमध्ये साधू नावाच्या बेटावर साकारला जाणार आहे. त्यावरून गेल्या महिन्यात काही विवाद झाले. नेहरू-पटेल विचारांवर टिप्पणी झाली. त्या प्रकल्पाविषयी.... स्टॅच्यू ऑफ युनिटी `स्टॅच्यू ऑफ युनिटी' ह्या प्रकल्पाचे जनक आर्किटेक्ट श्री.प्रभाकर महादेवराव कोल्हटकर सध्या पुण्यात स्थायिक आहेत. त्यांच्या मुलाखतीचे रूपांतर - ` हे काम माझ्या हातून होत आहे. आम्ही मूळ बडोद्याचे. माझे वडील श्री.महादेवराव कोल्हटकर हे उत्तम शिल्पकार होते. त्याकाळी शिल्पकलेचे शिक्षण कुठे मिळत नव्हते. सॅण्ड कास्टींग हा प्रकार औद्योगिक जगतात माहीत होता. लॉस वॅक्स कास्टींग हे ब्राँझ किंवा पंचधातूचे पुतळे करण्यासंबंधीचे ज्ञान माझ्या वडिलांनी परदेशी मासिकातून मिळवले आणि पुतळे करण्यामध्ये आपला खास ठसा उमटवला. त्यावेळी असे पुतळे कोणाला करता येत नव्हते. माझ्या वडिलांनी असे पुतळे तयार करण्यासाठी स्वत:ची फाऊंड्नीही सुरू केली होती. लहान-मोठे पुतळे करता करता एक काम व...

about Harshad Godbole

हर्षदची चित्रकृती कोलंबोत सांगलीचा हर्षद गोडबोले याने आमिरखान यांच्या `तारे जमीं पर' चित्रपटाच्या टायटल्ससाठी `क्ले मॉडेलमेकिंगचे' काम केले. त्याची चित्रकृती नुकतीच कोलंबो येथे २५ नोव्हेंबर पासून भरलेल्या `आर्ट कट्टा' पुणे यांच्या इंटरनॅशनल आर्ट एक्झिबिशनमध्ये प्रदर्शित झाली. हर्षदने बापट बाल शिक्षण मंदिर व सिटी हायस्कूल सांगली येथे चित्रकलेचे प्राथमिक धडे गिरवले. पुण्यात कमर्शिअल आर्टचा पाच वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला. फोटोग्राफीची पदवी प्राप्त केली. कॉम्प्यूटर अॅनिमेशनमध्येही शिक्षण घेतले. त्याने `शाळा' या चित्रपटासाठी चित्ररेखाटनाचे काम केलेले आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झालेल्या `हॅपी प्लॅनेट' या शॉर्ट फिल्मचे क्ले मॉडेल मेकिंग केलेले असून पुण्यात होणाऱ्या एकांकिका स्पर्धांसाठीचे नेपथ्यही त्याने केलेले आहे. हिंदी/मराठी जाहिरातींसाठीचे/सिनेमांचे स्टोरी बोर्डींगचे कामही त्याने केलेले आहे. कोलंबो येथील इंडिया कल्चरल सेंटरमध्ये चित्रप्रदर्शनात हर्षदचेही चित्र प्रदर्शित झाले. पत्ता : द्वारा-माधव गोडबोले, प्लॉट नं.८, अकुजनगर, कुपवाड रोड, सांगली (मोब...

30Dec.2013

अन्नसेवन : यज्ञकर्म की मस्ती? अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे. तीही न भागविता येणारी कित्येक माणसे आहेत, पण त्याचवेळी अन्नाची नासाडी  करणारीही आपल्यासारखी कित्येक माणसे आहेत. लोकांना जेवू-खाऊ घालण्यात एक आनंद असतो; एकत्र जेवण्यातही आनंद असतो; आणि आग्रह करण्यात वा करून घेण्यातही आनंद असतो. अशा आनंदासाठी अन्नाचे चार घास वापरात आले तरी काही हरकत नाही. अगदी गरजेपुरतेच खावे हे तर वैज्ञानिकदृष्ट्या खरेच आहे परंतु परस्पर भावनांसही आयुष्यात स्थान असते. आपल्याकडे कोणी आले तर त्याचा पाहुणचार करण्यासाठी चहा देणे ही एक रीत आहे; गरज नक्कीच नाही. म्हणजे असा केवळ भावनिक चहाच्या कपाचा विचार केला तरी दररोज दर माणशी एक कप चहा `ज्यादा' होतो. त्या हिशेबाने देशात १०० कोटि कप म्हणजे पाचशे कोटि रुपयांचा चहा अनावश्यक होतो. पण तो `वाया' गेला असे मानले जात नाही कारण तसा चहा देण्या-घेण्यातला आनंद हीसुद्धा एक गरज आहेच. प्रश्न आहे तो चक्क वाया जाणाऱ्या म्हणजे फेकून दिल्या जाणाऱ्या अन्नाचा. लग्न-मुंज हे पूर्वी पिचत होणारे भव्य समारंभ. त्यातही अगदी निकटच्या अंतरावरून येण्याचे घडत असे. दळणवळण कमी. फारतर पं...

23Dec.2013

माझी साहित्यविचार-यात्रा... काय झालं, माझ्या जरा उत्साही आणि शहाण्या मैत्रिणींनी, अचानक काहीतरी ललित लेखनाचं खूळ डोक्यात घेतलं. आता प्रत्येकीनं काहीतरी मदत करणं आलंच! कुणी लेख लिहितंय, कुणी चित्रं काढतंय, कविता करतंय! मला या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सर्वांसाठी चहा करणे किंवा त्यांना स्कूटरवर मागे लादून हेलपाटे मारणे एवढी `ढोबळ' कामे फक्त जमू शकतात. (असतं एखादं माणूस जाड! त्याला फस्कन हसायचं काय एवढं!) माझं बाई डोकं चालतं, पण जरा तिरकं! तर या सगळयाजणी कथाकाव्यनिबंध अशा रुणझुणत होत्या. काय काय चाललेलं! मी आपली म्हणतेय,`नवे प्रवाह, नव्या कल्पना, नवी आव्हाने' तर `तू चहा टाक जा परत एकदा' असं म्हणून मला पिटाळलं मेल्यांनी आत. इकडे चहाबरोबर माझे विचार उकळायलाच लागले. दररोज मी मुलीला सोडणे-आणणे, शाळा-क्लासेस अशा घिरट्या घालत असतेच. आता या सगळयात व्यायामाला कुठून वेळ आणू? पण खर्र सांगते, माझी दिव्य स्कूटर + आपले रस्ते हे मला रोजच्या स्कूटरिंगमध्ये व्हायब्रेशन मसाज, शॉक, अॅक्युप्रेशर असे फायदे सहज मिळवून देतात! शिवाय चाकाने जर या सगळयात `अॅक्युपंक्चर'केलं, तर तो जास्तीचा एक...

16Dec.2013

स्वदेशीच्या चळवळीनं प्रेरित होऊन महाराष्ट्नतील अनेक तरुणांनी कारखानदारी चालू केली. त्यात ओगलेवाडीसारख्या छोट्या गावात `स्टील विंडोज' उद्योग `डी.एन.म्हैसकर आणि कंपनी'नं सर्वप्रथम चालू केला.या कारखान्याचे प्रवर्तक दामोदर नृसिंह म्हैसकर यांचा जन्म जोतिबाचे डोंगरावर २५ डिसेंबर १९०५ रोजी झाला. एक होता उद्योजक दामोदर नृसिंह म्हैसकर त्यांचे वडील नृसिंह रामचंद्र (नरसोपंत) कीर्तनकार होते. नरसोपंतांचे सासरे प्रभाकरपंत ओगले. दामोदरचं आजोळ कोल्हापुरातच असल्यानं मामा लोकांकडे ओढा होता. त्यांना आठ मामा होते. व्यंकटराव व अवधूतराव यांचं नातं मित्रासारखं होतं. थोरले मामा गुरुनाथपंत व धाकटे आत्मारामपंत ओगले यांनी २५/१/१९१६ रोजी आैंध संस्थानातील विरवड्याच्या माळावर (कऱ्हाडजवळ) काच कारखाना चालू केला. दामोदरपंत १९२४ साली ओगलेवाडीत काच कारखान्यात रुजू झाले. इंजिनियरिंग कामाची आवड निर्माण झाली. गुरुनाथपंत जर्मनीस गेले होते. प्रभाकर कंदिल बनवण्याची यंत्रसामग्री तयार होईल तशी ते इकडे पाठवत होते. यंत्र उभारणीचा अनुभव दामोनर म्हैसकरांना श्री.आर.एन.लेले या तज्ज्ञ इंजिनियरच्या हाताखाली मिळाला. हे लेल...

9Dec.2013

व्यक्तीऐवजी संघटनात्मक संघर्ष स्त्रियांवरील अत्याचार ही गोष्ट सध्या फारच संवेदनशील मानली जात आहे. स्त्री-पुरुष असमानता जगाच्या प्रारंभापासून आहे. शारीरिक, स्वाभाविक आणि प्राकृतिक दृष्टीने पुरुष निसर्गत: सबल असतो म्हणून त्याने अरेरावी करावी हे आज कोणीच मान्य करणार नाही. त्या अरेरावीमुळे निम्मी मानवसंख्या पीडित होणे निखालस वाईट, पण त्याहीपेक्षा कौटुंबिक व सर्व सामाजिक असंतुलन होणे हे तर महाभीषण! ज्या आधारे कुटुंबसंस्था विकसित झाली आणि कुटुंबांच्या समन्वयातून समाज सुसंस्कृत सुदृढ व्हावा, तो आधार समानतेच्या भावनेवर भक्कम राहायलाच हवा; समानतेच्या आचरणावर नव्हे! बायकांनी पॅन्ट-शर्ट घालण्याने समानता येत नाही, उलट पुरुषांप्रमाणे वागण्याच्या इच्छेतून पुरुषांचे प्राबल्य स्वीकारल्याप्रमाणेच होते. त्यांनी निसर्गत: ज्या मर्यादा सांभाळायच्या असतात, त्यांचे उल्लंघन होण्यातूनही त्यांच्याविषयी अनादर वाढू शकतो आणि समस्याही वाढू शकतात. सुसंस्कृतपणे, हळूवारपणे समाजमनावर हे सर्व बिंबवले पाहिजे, तसे योग्य वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घराघरांनी घ्यावी लागते. त्याऐवजी महिलांच्या बाजूने कायदे आणि कोर्...

25Nov.2013

भय नको,बदल हवा नव्या जागतिक धोरणानुसार सर्व जगभर खुलीकरणाचे वारे सध्या वाहात आहेत. कोणत्याही देशामध्ये गुंतवणूक करून उत्पादन आणि व्यापार करण्याला खुलेपण येत आहे. आपल्या देशात मोठमोठे मॉल्स आणि किरकोळ विक्रीसाठी परदेशी कंपन्यांना परवानगी देण्याचा सरकारचा निर्णय पुष्कळदा वादग्रस्त होतो आहे. त्यातले राजकारण सोडून दिले तरी, दळणवळणाची साधने आणि जागतिक आर्थिक नीती विचारात घेतली तर अशा प्रकारच्या मोठ्या व्यापारी संस्था-संघटनांना एकमेकांच्या देशात जाऊन व्यवसाय-धंदा करणे आवश्यकही बनले आहे. यापैकी सरकारी गोंधळ किंवा राजकारण बाजूला ठेवले तरी गावोगावच्या सामान्य व्यापाऱ्यांना खूप धास्ती आणि भय घातले गेले आहे. विदेशी कंपन्यांची मोठी दुकाने किरकोळ व्यापार करण्यासाठी गावोगावी आली तर, आपल्या इथला सामान्य व्यापारी संपून जाईल असे भय व्यापाऱ्यांनाही आतून वाटत असेल तर ते तितकेसे खरे नाही हे समजून घेतले पाहिजे. कुठल्याही व्यवसायाच्या दोन गरजा असतात. एक म्हणजे भांडवल पुरवठा आणि दुसरी गरज सेवाभाव अशी असते. केवळ भांडवल गुंतवून एखाद्या पेठेत दुकान सुरू केले की गिऱ्हाईक मुकाट्याने दारात येते असा आजपर्यंतचा ...