Skip to main content

Posts

Maza Column in 14 NOV.2011

फराळाचा शिल्लक चुरा दसरा किंवा पाडव्याला श्रीखंड करायची रीत होती, तशी पंचमी-होळीला पुरणपोळी असायची. आताही ती असते परंतु दोन दिवस आधीपासून त्याची तयारी करावी लागत नाही. दूध साठवून ते तीनतीनदा तापवायचं, विरजून दही लावायचं, पातळ फडक्यात ते ओतून त्याचं चुमडं बांधून खुंटीला चार-सहा तास टांगायचं, पाणी पूर्ण निथळलं की तो मऊशार चक्का फेसून घेत साखर मुरवायची.... इतकं काही आता करावं लागत नाही. परवा आमचा एक मित्र जेवायला आला. पंगत सुरू झाल्यावर श्रीखंड चाखत म्हणाला, ``वा! श्रीखंड मस्तच झालंय...!! कसं किलो मिळालं?'' कुठलाही पदार्थ कुणाही घरी आयता तयार विकत आणलेला असणार हे आता लपविण्याइतकं नवीन राहिलं नाही. पुरणपोळी, कुरड्या-पापड, लोणची-मसाले, पिठं-भाजण्या-पिठी-रवा-मेतकूट.... वाट्टेल ते. घरी कुठं करता! आता तर हे जिन्नस विकत आणून घरी पाहुणचार करणं हेसुद्धा जिकीरीचं आहे. कुणी घरी यायचं म्हणजे नाही म्हटलं तरी आवरासावर करावी लागते. फुलदाणीतले गेंद प्लॅस्टिकचेच असले तरी ते स्वच्छ करावे लागतात. पलंगपोस बदलावे लागतात, बेसीन धुवावे लागते. शिवाय नंतर खरकट्या भांड्यांचा ढीग पडतो, अन्न उरून बसतं!...

Lekh on Gangadhar Divakar Gharpure in 14 NOV.2011

`गं. दि.'- हाच रामबाण उपाय कोणत्याही निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या, व मतपत्रिकेवर दिसणाऱ्या सर्वच्या सर्व उमेदवारांना नाकारण्याचा एक पर्याय मतदारांना द्यावा; त्यामुळे नव्या अधिक पात्र उमेदवारांस संधी मिळू शकेल अशी एक मागणी सध्या चर्चेत आहे. त्याचप्रमाणे अकार्यक्षम वा नापसंत प्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार (राईट टू रिकॉल) लोकांना असावा असेही म्हटले जाते. निवडणूक आयोगाने या मागण्यांना विरोध करून, अधिक पात्र उमेदवार देणे व त्यांना निवडून संधी देणे ही नागरिकांचीच जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले आहे. मतपत्रिकेवरचे सर्व उमेदवार नाकारणे किंवा प्रतिनिधीला परत बोलावणे यांमुळे पुन्हा (पुन्हा) निवडणुका घ्याव्या लागण्याचा धोका असून त्यातून लोकशाहीचे गांभीर्य कमी होईल असेही म्हटले आहे. अपात्र किंवा काही वेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी व तशाच कार्यपद्धतीच्या लोकांनी आपली लोकशाही यंत्रणा व समाजव्यवस्था कुरतडून टाकली आहे हे तर खरेच आहे पण त्याचे मूळ कारण `चांगले लोक' आत्मकेंद्री बनून सामुदायिक क्षेत्रांकडे फिरकणेच बंद झाले आहे. सध्याची शिक्षणव्यवस्था भीषण आहे, पण आपल्या आधीच्या दोन पिढ्यांन...

Lekh on Ambabai Navratri Sangeet Mahostav, Miraj

श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव, मिरज - श्रीकांत येडूरकर मिरजेचे ग्रामदैवत असलेली अंबाबाई. या मंदिराचा इतिहास सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा आहे. मिरजेतील चंदूरकर-देशपांडे घराण्यातील पूर्वजांना तुळजापूरची भवानी दर्शन देण्यासाठी मिरजेत आली अशी आख्यायिका आहे. देवीची मूर्ती तुळजापूरच्या भवानीमातेची प्रतिकृती आहे. चैत्र प्रतिपदा ते शुद्ध नवमी या काळात देवीच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडतात. नित्य पूजेसाठी गुरवाची नियुक्ती आहे. ती मंडळी अत्यंत भक्तीभावाने देवीची सेवा करतात. आश्विन शुद्ध १ ते १० नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. नऊ दिवस महापूजा, अभिषेक असतो. शिवाय दरमहा दुर्गाष्टमीस स्थानिक कलाकार देवीची संगीतसेवा करतात. प्राचीन काळात नायकिणी व कलावंतिणी गान/नृत्यातून मिरजेतील अंबाबाईची सेवा करीत असत. यातून नवरात्रात संगीत सेवेची कल्पना पुढे आली असावी. मिरज नगरीच्या उत्तर दिशेस जुन्या मालगाव वेशीत अंबाबाईचे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम इ.स.१६०० मध्ये केले. जीर्णोद्धार १९८२ मध्ये झाला. सन २००८ मध्ये शिखर बांधकाम झाले. मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. मिरजेत पूर्वी सरस्वतीबाई सानी (कागवाडकर), ...

Sampadkiya in 24 OCT.2011

गेल्या पन्नास शंभर वर्षांतील भारताची प्रतिमा गरीब देश म्हणून आहे. याच काळात युरोप-अमेरिकेतील श्रीमंती कुणाच्याही नजरेत भरणारी होती. कैक वर्षांमागे भारतभूमीत सोन्याचा धूर निघत होता म्हणतात, त्या काळी तिकडील वस्ती आदिम अवस्थेच्या वल्कलांत वावरत होती. काळाचा फेर चक्रमेनिक्रमेण वरखाली होत असेल तर येता काळ पुन्हा भारताचा असू शकेल कारण अमेरिका-युरोपात शब्दश: यादवीला आणि आर्थिक वर्गसंघर्षाला प्रारंभ झाल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. अर्थात् त्याचा प्रत्यक्ष परिणाम लगेचच तिथे दिसू लागेल असे नव्हे आणि भारताला केवळ कालगतीनेच संपन्नता येईल असाही भ्रम नाही. `अर्थस्य पुरुषो दास:' याचा चिरंतन प्रत्यय येत असला तरी निव्वळ स्वत:च्या बुडाखाली संपत्ती साठवत नेण्याचा अढळ परिणाम पुन्हा कफल्लक होण्यातच असतो हेही वारंवार अधोरेखित होत आलेले आहे. संपत्तीची देवता लक्ष्मी ही चंचल असते म्हणतात, ते त्याच अर्थाने असावे. म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या सणाला दीपज्योतींचा सन्मान करण्याला महत्त्व आहे. पूर्वपरंपरेने पिढीजात चालत आलेला चांदीचा खणखणीत रुपाया देवघरात ठेवून, त्याचे पूजन होते. तो त्या दिवशीचा मान नोटांच्या थप्...

Sampadkiya in 3 OCT. 2011

प्रकाशदिशा अनेक व्यक्ती व संस्था आपापल्या परीने काम करत असतात. त्यांच्या आधारावरच समाज उभा असतो भावी काळासाठी काही मूल्येही जोपासली जात असतात. अशी कोणी व्यक्ती, संस्था, प्रसंग यावरती भाष्य करण्यासाठी आजवर या स्थलाचा वापर फार पिचत् केला गेला असेल, त्याउलट एखाद्या विचाराचा किंवा कृतीचा अथवा प्रसंगाचा मागोवा घेऊन त्यामागील तत्त्वविचारांचा परामर्श घेण्याची प्रथा सांभाळली गेली होती. प्रस्तुत अंकात तसा अपवाद करावा असे वाटले याचे कारण एक व्यक्ती किंवा तिने उभा केलेला पैसा अर्पण करण्याचा सोहळा एवढेच निमित्त नाही तर त्यामागील अंत:करणाची बैठक आणि सर्व समाजापुढे नव्या बीजाची पेरणी करण्याची असोशी ही त्यामध्ये महत्त्वाची वाटते आजच्या काळात सामाजिक कामे होत नाहीत असे कोणी म्हणणार नाही. गांधीजींनी ज्या काळी महाराष्ट्नला कार्यकर्त्यांचे मोहोळ असे म्हटले त्या काळात सामाजिक कार्याला किंवा ते करणाऱ्या कार्यकर्त्याला खूप चांगले दिवस होते अशातला भाग नाही. देशासाठी, धर्मासाठी अथवा समाजरूपी देवासाठी प्रपंचावर निखारे ठेवून आयुष्य झोकून देणारे अनेकजण असतात. अशा संस्थांचा प्रतिपाळ करणे हेही समाजाचेच कर्त...

Lekh on Lulla Trust in 3 OCT. 2011

दान सोपं, त्याचा भाव जागवावा! - विनिता तेलंग, सांगली सिंधूच्या तीरावर मुळं असलेल्या व कृष्णेच्या पाण्यावर भरणपोषण झालेल्या लुल्ला परिवाराने अर्घ्यदानाचा एक अभिनव कार्यक्रम गतवर्षी केला. त्या संस्कार सोहळयाचे हे दुसरे वर्ष. आपल्या सांपत्तिक उत्कर्षाच्या काळात, निव्वळ वैयक्तिक वा कौटुंबिक हौस-मौजेत व्यय न करता, ज्या समाजामुळे आपल्याला उत्कर्ष साधता आला, त्या समाजाच्या ऋणातून अंशत: मुक्त होण्याची संधी त्यांनी अर्घ्यदानाच्या रूपाने निर्माण केली. श्री. किशोर लुल्ला यांचे वडील श्री.तोतारामजी लुल्ला यांच्या मनात हा संकल्प होताच. त्यांच्या निधनानंतर त्यास मूर्त रूप देण्याचे श्री.किशोर व त्यांच्या कुटुंबियांनी ठरविले व त्यातून हा कार्यक्रम साकार झाला. गेल्या वर्षी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने केलेला कार्यक्रम निव्वळ नैमित्तिक, तात्कालिक उमाळयातून आलेला नव्हता; तर स्वत:ला व आपल्या परिवाराला अशा प्रकारच्या समर्पण संस्काराची एक सवय, शिस्त ते लावू पाहात आहेत. स्वत:बरोबरच समाजातही हा विचार पुन:पुन्हा रुजवू पहात आहेत, म्हणूनच गेल्यावर्षीचा एक उत्कट सोहळा चालू वर्षी एका सुंदर-...

Sampadkiya in 26 Sept.2011

नवे सीमोल्लंघन हवे... हवामान खात्याकडून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पावसाळा संपल्याची लक्षणे दिसत आहेत. महाराष्ट्नतील दोन-तीन जिल्हे वगळले तर कोकण आणि विदर्भात भरपूर पाऊस पडला. तरीही एकंदरीत चित्र नियमित पावसाचे नाही. जिथे पडला तो महाप्रचंड पडला आणि मानवी जीवनात त्याने खूप गोंधळ निर्माण केला. तर काही जिल्ह्यात हवा कोरडी नसली तरी रोगट होती. पण पुरेसा पाऊस नाही. या सगळयाचा अर्थ एकच होतो की पाऊसकाळ नियमित झालेला नाही. शास्त्रीय आकडेवारी सांगण्यासाठी त्याने सरासरी गाठली असे म्हणता येईल. आठवड्याभराचे अन्न एकाच दिवशी खाल्ल्यासारखा तो प्रकार झाला आहे. तरीसुद्धा महागाई आणि चलनवाढीचे आकडे सांगताना पावसाचे निमित्त पुरेसे ठरण्यासारखे आहे. पाऊसकाळ चांगला झाला किंवा वाईट झाला ते माणसाच्या कर्तबगारीवरही ठरते. दुष्काळ पडला हे निमित्त सरकारने वास्तविक कधीच सांगू नये. तर दुष्काळ निवारणासाठी जे प्रयत्न आवश्यक असतात ते तडफदारीने केले पाहिजेत. अचानक कोसळणारी दरड वाहतुकीत व्यत्यय आणते हे खरे आहे. परंतु त्याचे निवारण कसे होते हे सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आणि त्याही पुढे जाऊन पुन्हा अशी आपत्ती...